Ticker

6/recent/ticker-posts

कडाक्याचा थंडीत चिमुकल्यासह गरजवंतांना मिळाली मायेचा ऊबवाशीम जिल्हा माहेश्वरी संघटन व तरूण क्रांती मंचचा पुढाकार


वाशिम : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या वाशीम जिल्हा माहेश्वरी संघटन व तरूण क्रांती मंचच्या वतीने कडाक्याच्या थंडीत स्थानिक ग्रामीण  पोलीस स्टेशन समोरील झोपडपट्टीतील बालकांना उबदार स्वेटर, कपडे, टोपी तसेच सर्व कुटुंबियांना सोलापूरी चादर, महिलांनाही कान टोपीचे वितरण करण्यात आले.  सध्या संपूर्ण जिल्हयात थंडीची लाट असून शहरात अनेक भागात अनेकांना उघड्यावर झोपावे लागत आहे.  दरवर्षीप्रमाणे वाशीम जिल्हा माहेश्वरी संघटन व तरूण क्रांती मंचच्या वतीने 17 डिसेंबर रोजी हा उपक्रम ग्रामीण पोलीस्स स्टेशन समवेत शहरात अनेक भागात राबविण्यात आला. यावेळी वाशीम जिल्हा माहेश्वरी संघटनेचे अध्यक्ष शिवलाल भुतडा, सचिव कैलास मुंदडा, तरूण क्रांती मंच जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी, प्रविण  पाटणी आदिंच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला.  आकस्मीकपणे मिळालेल्या या आगळयावेगळया भेटीने बालकांच्या चेहर्‍यावर स्मितहास्य निर्माण झाले.  यावेळी अनेक गरजवंत महिलांनी त्यांनाही थंडीपासून बचाव करण्यासाठी ऊबदार कपडे, ब्लॅकेट हवी असल्याची मागणी केली.  संघटनेने तत्काळ त्यांच्या मागणीला दाद देवून सोलापूरी चादर व ऊबदार कपडे दिले.  समाजामध्ये आज खर्‍या अर्थाने अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमाची गरज असून अन्य संघटनांनीही यापासून प्रेरणा घेवून असे उपक्रम राबविणे काळाची गरज आहे.  

Post a Comment

0 Comments