Ticker

6/recent/ticker-posts

नारायण बाहेती यांच्या खरी दिवसा घरफोडी



मंगरूळपीर येथील घटना नारायण दामोदर बाहेती सिद्धेश्वर कॉलनी वार्ड क्रमांक एक मधील रहिवासी मंगरूळपीर यांच्या घरी  कोणी नसल्याचे पाहून घराला लावलेले कुलूप तोडून आत मधील कपाट फोडले सामान अस्तव्यस्त करून कपाटाच्या लोकर मधील 92 ग्राम सोने व 65 हजार रुपये नगदी  433000 हजाराची मुद्देमालासह चोरट्यांनी 11, 12 ,20 21 रोजी भरदिवसा पळवले. चौकीदार झोपण्यासाठी संध्याकाळी आल्यावर ही घटना चौकीदार संजय शिंदे ने दरवाजाचे कुलूप तुटलेले  असल्याचे  पाहिल्याबरोबर नारायण बाहेती त्यांना माहिती देऊन घटनास्थळी बोलावले बाहेती हिंगणघाट वरून  ताबडतोब आले व पोलीस स्टेशनला धाव घेतली व झालेल्या घटनेची पोलिसांना माहिती देऊन आपली तक्रार  देण्यासाठी रात्रीला बाहेती यांची तक्रार  पोलीस स्टेशनला घेण्यात आली नाही दुसऱ्या दिवशी तक्रार दाखल झाल्यावर पोलीस प्रशासन यांच्यावर काय कारवाई करणार अशी उलट सुलट चर्चा शहरात मात्र जोर धरत आहे .


 कोरोना महामारी सारख्या आजाराने दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. या चोरट्यांनी घरफोडी चा सपाटा लावल्याने मंगरूळपीर शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात धास्तावले आहे. दिवसाढवळ्या घर फोडणे म्हणजे पोलिसांच्या  छातीवर तांडव नृत्य केल्यासारखे आहे पोलिसांसमोर हे एक मोठे आव्हान असल्याचे नागरिकात बोलले जात आहे. अज्ञात चोरांविरुद्ध मंगरूळपीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपास मात्र कसून सुरू असल्याचेही चित्र पाहावयास दिसत आहे



Post a Comment

0 Comments