Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर शहरात सुभाष राऊत यांच्या घरी दिवसा दरोडा



पोलिसांसमोर मोठे आव्हान सुभाष राऊत यांच्या घरी दिवसा दरोडा,

 व तीन दिवस आधी नारायण बाहेती यांच्या घरी मोठी चोरी झाली होती त्याचा तपासण लागताच ही दुसरी घटना

मंगरुळपीर शहरातील बस स्टँड पाठीमागील गुरुकृपा कॉलनी येथे दरवाज्याचे कुलूप तोडून मोठा दरोडा मुद्देमाल अज्ञात दरोडेखोरांनी लंपास केल्याची घटना १५ डिसेंबर रोजी 12 ते 3 च्या दरम्यान घडली रहदारीच्या ठिकाणी अशी घटना घडणे म्हणजे पोलिसांना केलेले चालेंज.


 सुभाष दादाराव राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार 218 ग्रॅम सोनं व 44 हजार रुपये रोख रक्कम पोलिसात फिर्याद दिल्यानुसार  रुपये 1124100 मोठा दरोडा झाल्याची मंगरुळपीर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे .दिवसा झालेल्या दरोड्या मुळे जनसामान्यात भितीचे वातावरण पसरले आहे. शहरात यापूर्वी कारंजा रोड परिसरातील नारायण बाहेती त्यांच्या घरी सुद्धा दिवसा चोरी झाल्याची पोलिसात तक्रार दाखल केली होती. आणि तीन दिवसांनी सुभाष राऊत यांच्या घरी दरोडा पडल्यामुळे शहरात उलटसुलट चर्चा होत आहे.
वाशिम जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्यासमोर मोठे आव्हान उभे झाले आहे

मंगरूळपीर शहरात होत असलेल्या छोट्या मोठ्या चोर्‍या मुळे व घरफोड्या मुळे  चोरट्यांचे मनोबल वाढले असल्यामुळे राऊत यांच्या घरी दरोडा झाल्यामुळे जनसामान्यात बोलल्या जात आहे.
वाशिम जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक बच्चन सिंग व यांची यंत्रणा कामाला लागल्याची माहिती  सूत्राकडून मिळाली आहे.

पोलीस प्रशासनाची चोरट्या वरील व दरोडे खोरा वरील वचक कमी झाल्यामुळे दिवसा घरफोड्या व चोऱ्या दरोड्याच्या घटना होत असल्याचे नागरिकात बोलले जात आहे. पोलिसांनी कसून चौकशी केला तर निश्चितपणे हा गुन्हा उघडकीस होण्याची शक्यताही नाकारता येत नाही कारण या पूर्वी खूप मोठ्या मोठ्या गुन्ह्याचा तपास लावून चोरट्यांना गजाआड केले आहे

Post a Comment

0 Comments