प्रमुख मार्गदर्शक
सौ. दर्शना लाहोटी
मंगरूळपीर-स्थानिक यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयात गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळ अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून पोस्टर रांगोळी आणि पुष्परचना प्रशिक्षण एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक 3 जानेवारी 2022 सोमवार रोजी करण्यात आले.
प्रथम सत्रात कार्यशाळेचे अध्यक्ष प्रा. कल्याणी अनपट, प्रमुख मार्गदर्शक सौ. दर्शना लाहोटी ,समन्वयक प्रा. सौ. सुषमा जाजू मंचकावर उपस्थित होते. सर्वप्रथम प्रतिमापूजन व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
त्यानंतर दीक्षा सोनवणे यांनी सावित्रीबाई फुले बद्दल सविस्तर विचार मांडलेत. समन्वयक प्रा. जाजू यांनी कार्यशाळेचे उद्देश स्पष्ट केले आणि पुष्परचना चे विविध प्रकार, साहित्य याबद्दल प्रात्यक्षिके द्वार हे प्रशिक्षण दिले, पुष्परचनेचे उद्दिष्टे स्पष्ट केले,
प्रमुख मार्गदर्शक सौ. दर्शना लाहोटी यांनी पोस्टर रांगोळी चे प्रशिक्षण प्रात्यक्षिकाद्वारे दिले ,त्यावेळी ते म्हणाले की आज अर्थार्जना करिता आपल्या मध्ये काही कौशल्य निर्माण करणे आवश्यक बाब झाली आहे. रांगोळी, पुष्परचना, बुके याद्वारे अर्थाजन करू शकतात तसेच अध्यक्षीय भाषणात प्रा. कल्याणी अनपट मॅडम यांनी कार्यशाळेचे कौतुक केले आणि ही कला सर्व मुलींनी आत्मसात करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.
कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात पोस्टर रांगोळी आणि पुष्परचना बुके चे प्रशिक्षण प्रात्यक्षिके द्वारे देण्यात आले, त्यात काही विद्यार्थिनींनी रांगोळी व पुष्परचना करून बघितले, आपल्या शंका-कुशंका बद्दल हितगुज करण्यात आली.
यात कला विभागाचे भाग बी.ए. 1 ,2, 3 चे गृहअर्थशास्त्र विषयाच्या 55 विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला व प्रमुख मार्गदर्शक यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आली.
ही कार्यशाळा संस्थेचे सचिव माननीय चंद्रकांत दादा ठाकरे यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन प्राचार्य डॉ. कान्हेरकर सर यांच्या मार्गदर्शनात प्रा. सुषमा जाजू यांनी राबविले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रिया राऊत, सानिका खाडे यांनी तर आभार प्रदर्शन पूजा सोळंके, राणी जमनिके यांनी मानले व कार्यशाळा यशस्वी संपन्न झाली.
प्रा. सौ. सुषमा जाजू
समन्वयक
गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळ. य.च. कला व विज्ञान महाविद्यालय. मंगरूळपिर, जि. वाशिम







0 Comments