वाशिम - शहरातील रेल्वे गेट नजीक पाल ठोकुन वास्तव्य करणार्या गोरगरीब मजुरांच्या शाळाबाह्य मुलांना महाराष्ट्र महिला पोलीस संगीताताई ढोले ह्या विद्यादानाचे महान कार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेवून आपलाही या पवित्र कार्यात खारीचा वाटा असावा या उदात्त हेतूने राष्ट्रसेविका समितीच्या वतीने या मुलांना गणवेशाचे वितरण करण्यात आले.
तसेच या मुलांना मोफत शिकविणार्या पोलीस संगीताताई ढोले यांचाही राष्ट्रसेविका समितीच्या वतीने भावपुर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रसेविका समितीच्या अध्यक्षा सुनिता कोरान्ने, भाजपा महिला मोर्चाच्या वाशिम शहर सरचिटणीस सौ. छाया पवार (खडसे), नगरसेविका करुणाताई कल्ले यांच्यासह राष्ट्रसेविका समितीच्या सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.


0 Comments