Ticker

6/recent/ticker-posts

सायक्लोथोंनद्वारे एनसीसी विद्यार्थ्यांनी दिला फिटनेसचा संदेशआझादी का अमृत महोत्सव निमित्त आयोजन



वाशिम - तहसील माहेश्वरी संघटन वाशिम तथा शर्मा बंधुंच्या वतीने २ जानेवारी रोजी शहरात आयोजीत सायक्लोथोंन २०२२ मध्ये स्थानिक श्री बाकलीवाल विद्यालयाच्या एनसीसी विद्यार्थ्यांनी सहभाग घेत नागरीकांना सायकलचा नियमित वापर करुन निरोगी व स्वस्थ आयुष्य जगण्याचा ंदेश दिला. या उपक्रमात ११ महाराष्ट्र बटालियन अकोलाचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल चंद्रा प्रकाश बदोला यांच्या मार्गदर्शनात एनसीसी अधिकारी अमोल काळे यांच्या नेतृत्वात ६८ एनसीसी विद्यार्थ्यांनी सहभाग घेत सलग ३० किलोमीटर सायकल चालविली. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक बबनराव बिल्लारी, उपमुअ दंभीवाल, पर्यवेक्षिका सौ. भोंडे, एनसीसी अधिकारी अमोल काळे यांनी कौतुक केले.

Post a Comment

0 Comments