वाशिम - पीपल्स् एज्युकेशन सोसायटी बुलडाणा व्दारा संचालित गव्हाणकर नगरस्थित दिशा मुलींचे निरीक्षण गृह व बालगृहात ३ जानेवारी रोजी सावीत्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमास बालकल्याण समिती अध्यक्षा डॉ. सौ. जयश्री गुट्टे, बालकल्याण समिती सदस्या सौ. अरुणा ताजणे, बालकल्याण समिती सदस्य अशोक ताजणे, प्रकाश जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. प्रारंभी डॉ. सौ. जयश्री गुट्टे यांचे हस्ते दिप प्रज्वलीत करुन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पण करण्यात आले. त्यानंतर सौ. अरुणा ताजणे, अशोक ताजणे, प्रकाश जोशी, संस्थेचे अधिक्षक गोपाल मोरे, जानराव वाघ, सौ. संगीता बेले यांच्या हस्ते सावीत्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या औचित्याने उपस्थितांनी आपल्या मनोगतातुन सावित्रीबाई फुले यांच्या जिवनकार्यावर माहिती दिली. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन गोपाल मोरे यांनी केले.

0 Comments