वाशिम - स्थानिक श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष स्नेहदीप सरनाईक यांच्या मार्गदर्शनात व विद्यार्थी विकास विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष व राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकारातुन ३१ डिसेंबर व १ जानेवारी अशी दोन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली.
कार्यशाळेला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर वाहाने तर तज्ञ मार्गदर्शक म्हणून पुणे येथील आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक मनोज कनोजिया, अनिल वाघ, अशांत कोकाटे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासह संकटप्रसंगी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षीकासह धडे दिले. यावेळी तज्ञ प्रशिक्षकांनी आग प्रतिबंधक व्यवस्थापन आणि आग नियंत्रण व्यवस्थापन व पुर्व सज्जता आणि बचाव व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करून आग विझविण्यासाठी करावयाची कार्यवाही याबाबत प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन केले. यासोबतच आग प्रतिबंधक व्यवस्थापन आणि आग विझविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व अग्निशमन यंत्राचे प्रकार आणि ओळख व त्याला हाताळण्याची कार्यपद्धतीवर मार्गदर्शन केले. तसेच परिसरातील नागीरकांना नैसर्गीक व मानवनिर्मित नैसर्गीक व मानवनिर्मित आपत्तीच्या काळामध्ये संकटाला कसे सामोरे जावे व त्यातुन आपला व दुसरचा जीव कसा वाचवावा याचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण व माहिती प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली. आगीपासून कसा बचाव कराव. आग म्हणजे काय? आगीचे प्रकार? आग विझविण्याच्या पद्धती? अग्निशमन प्राथमिक उपकरणे या सर्व शंकांचे प्रश्नोत्तराच्या माध्यमातून त्यांनी निरसन केले. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी आपादग्रस्तांचे प्राण वाचवणे व वित्तहानी टाळणे जिकरीचे असते. तथापि सुनियोजित व्यवस्थापनाने हे साध्य होऊ शकते. याचे व्यवस्थापन कसे करावे या बाबी विद्यार्थ्यांनी समजून घेतल्या.


0 Comments