Ticker

6/recent/ticker-posts

भीमा कोरेगाव शौर्यदिन , रामभाऊ ठाकरे, यांच्या हस्ते ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन



पुणे शहरापासून 20 किमी अतंरावर भीमा नदीच्या काठावर वसलेल्या कोरेगाव या गावात दरवर्षी 1 जानेवारीला देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो दलित अनुयायी येतात, निमित्त असते कोरेगाव भीमाच्या शौर्य दिनाचे. याच शौर्याचे प्रतीक असलेल्या विजय स्तंभाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927  रोजी आपल्या अनुयायांसह भेट देत मानवंदना दिली होती. 


तेव्हापासून हजारो अनुयायी दरवर्षी मोठ्या उत्साहाने भीमा कोरेगावला येतात. यंदा कोरेगाव भीमाच्या शौर्यदिनाला 203 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने आज मंगरुळपीर येथील पंचशील नगरात समता सैनिक दल मंगरुळपीर तालुका द्वारा आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ,माननीय रामभाऊ ठाकरे, यांच्या हस्ते ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्या शूरवीर 500 योध्यांना मानवंदना अर्पण करण्यात आली.


Post a Comment

0 Comments