मंगरूपीर तालुक्यातील चेहेल येथे दि. ६/१/२०२२
वसंतराव नाईक माध्यमिक आश्रम शाळा चेहल येथे सुरू असलेल्या
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. दशरात्रोत्सवच्या ४ थ्या दिवशी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विलास मनवर , जी. प. शाळा लावना मुख्याध्यापक हे होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे प्राध्यापक आर. के. गवई सर ,
सत्कार मूर्ती वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी ,वसंतराव नाईक माध्यमिक आश्रम शाळा चेहल मुख्याध्यापक मोरे सर यांनी पत्रकार दिनाचे औचित्य साधून संपादक सुधाकर चौधरी यांना आमंत्रित करून यांचा सत्कार करण्यात आला,
विलास मनवर
मार्गदर्शनात सावित्रीबाई फुलेच्या कार्यामुळे आधुनिक काळातील स्त्री खऱ्या अर्थाने सक्षम झाल्याचे सांगितले.
सरांनी रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माहिती दिली. रमाबाई यांचा जन्म दाभोळजवळील वंणदगावातील एका गरीब कुटुंबात झाला होता.त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धुत्रे (वलंगकर) व आई रुक्मिणी भिकू धुत्रे यांच्या सह त्या आपल्या दाभोळजवळील वंणदगावात राहत होत्या. रमाबाई यांचे लग्न त्याकाळीन बाल विवाह प्रथेनुसार करण्यात आले होते. लग्नाच्या काही वर्षानंतर बाबासाहेब ई.स. १९२३ साली आपले पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडनला गेले. यानंतर रमाबाई संपूर्णपणे एकट्या पडल्या, त्यांना जीवनात आपला उदरनिर्वाह करण्यासाठी खूप कष्ट सहन करावं लागलं. त्या जिद्दीने आपल्या दु:खांचा आणि अडचणींचा सामना करत होत्या.बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना देऊ केलेली मदत रमाबाई यांनी नाकारली कारण, त्या एका स्वाभिमानी पतीच्या स्वाभिमानी पत्नी होत्या. रमाबाई आंबेडकर यांनी आपल्या जीवनात खूप दुःख पहिली व ते पाहून त्याही थोड्या थोड्या मेल्या. कारण, लहान पणीच आई व त्यानंतर वडिल यांचा मृत्यू झाला. त्यानंतर लग्नाच्या अवघ्या ७ वर्षानंतर वडीलांसमान सासरे रामजी सुभेदार यांचा ई. स. १९१३ साली मृत्यू झाला. बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला असतांना ई.स.१९१४ ते १९१७ साली रमेश यांचा मृत्यू झाला. बाबासाहेब परदेशात आपल्या शिक्षणात गेले असताना ,रमाबाई आंबेडकर यांनी आपल्या जीवनात खूप कष्ट केलं होतं. त्याचप्रमाणे दु:ख देखील उपभोगल होतं. जीवनात केलेल्या अपार कष्टांमुळे त्यांचे शरिर पोखरून गेलं होतं. त्यांना आजार बळावला होता. ई.स. १९३५ साली त्यांचा आजार वाढतच गेला आणि मे १९३५ साली तर त्यांचा आजार खूपच विकोपाला गेल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नामांकित डॉक्टरांना पाचारण केले होते.
यावेळी वसंतराव नाईक माध्यमिक आश्रम शाळा चेहल येथील विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते.
या कार्यक्रमासाठी उपस्थिती ए . ए मोरे मुख्याध्यापक,पी.एम. कदम,टी.एन.येवले,जी.पी. खडसे, कु. मनिषा,मेडम, ए.आर.डाबेराव, ए एम कळसकार,एम.आर. चव्हाण,जी.के.पवार, विद्यार्थी इतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन डि .के .कटारे यांनी केले







0 Comments