Ticker

6/recent/ticker-posts

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ७१ रक्तदात्यांनी केले रक्तदान राम पाटील ठाकरे मित्र मंडळाचा उपक्रम

ई श्रम कार्ड मध्ये १७१ महिला-पुरुष आँनलाईन नोंदणी
मंगरूळपीर/ ता प्र :- युवा नेतृत्व तथा युवकांचे पेरणास्थान राम पाटील ठाकरे यांचा वाढदिवस,  मित्र मंडळाचे वतीने विविध उपक्रम राबवुन साजरा करण्यात आला
        शहरातील प्रत्येक चौकात महामानव व थोर पुरूषांच्या प्रतिमेचे पुजन यावेळी राम ठाकरे यांचे हस्ते करण्यात आले,
तर पंचक्रोशीतील आराध्य दैवत संत बिरबलनाथ महाराज यांचे पुजन व दादा हयात कलंदर यांचे दर्गाहवर चादरही चढवण्यात आली,यावेळी शेख ईरफान सामाजिक कार्यकर्ते यांनी आयोजित केलेल्या ई श्रम कार्ड नोंदणी चा शुभारंभ अशोक नगर वार्ड क्रमांक १६ मधुन   १७१ महिला-पुरुष आँनलाईन नोंदणी




, तर स्थानिक सहकार भवन मध्ये सत्कार समारंभात व मित्र मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीर सुद्धा घेण्यात आले ज्या मध्ये मित्र






 मंडळाच्या ७१ रक्त दात्यांनी रक्तदान करून कोरोना सारख्या महामारी काळात आपला सहभाग नोंदवला,या कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत महाकाळ होते,प्रमुख उपस्थिती माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे, जेष्ठ नेते देवराव फुके,विठ्ठलराव गावंडे,वसंतराव पाटील, भावराव व्यवहारे,रमेश नावंधर,मुसा पटेल,मोबिन हक प्राध्यापक नंदलाल पवार, ह्यांचा राम ठाकरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला, 















अशा या भव्य सोहळ्यात विविध ठिकाणी राम पाटील यांचा सन्मान करण्यात आला दिलदार मनाचा राजा माणूस राम पाटील ठाकरे कार्यक्रमानंतर
तर यावेळी स्नेह भोजनाने सांगता करण्यात आली. या उपक्रमास राम ठाकरे मित्र मंडळांनी अथक परिश्रम घेतले

Post a Comment

0 Comments