Ticker

6/recent/ticker-posts

जिल्ह्यात भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजनलॉ. वसंतराव धाडवे मित्रमंडळाचा पुढाकार


वाशिम - जेष्ठ समाजसेवी लॉ. वसंतराव धाडवे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा महोत्सव अंतर्गत लॉयन्स क्लब प्रिंस परभणी, लॉ. वसंतराव धाडवे मित्रमंडळ व उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाच्या पुढाकारातुन शनिवार, २ एप्रिल रोजी आयुडीपी येथील सावित्रीबाई फुले नर्सिग कॉलेजमध्ये भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. गरजु रुग्णांच्या मोफत नावनोंदणीसाठी जिल्ह्यात विविध ठिकाणे निश्चित करण्यात आली असून तपासणीअंती निवड झालेल्या गरजु रुग्णांना मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रियेसह जेवण, येण्याजाण्याचा, राहण्याचा संपूर्ण खर्च, लेन्स व चष्मा पुर्णपणे मोफत राहणार आहे.
    रंजल्यागांजल्यांमध्ये सदैव देव राहणारे जेष्ठ समाजसेवी लॉ. वसंतराव धाडवे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत सेवा महोत्सवामध्ये निराधार महिलांना साडी व शिलाई मशीन वाटप, रक्तदान शिबीर, अंधव्यक्तींना काठीवाटप, दिव्यांग व्यक्तींना तीनचाकी सायकल वाटप, गरीब विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप आदी सेवाभावी कार्यक्रमासह भव्य मोफत नेत्र तपासणी शिबीर पार पडणार आहे. २ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यत स्थानिक आयुडीपी कॉलनीतील सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात येईल. नागरीकांना सोईचे जावे यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी नोंदणीची व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये श्री साई ऑप्टीकल महालक्ष्मी पेट्रोपंपाजवळ, दत्त मेडीकल तुर्के कॉम्प्लेक्स, श्री गजानन महाराज संस्थान आयुडीपी, आंबटपुरे मंडप डेकोरेशन राजनी चौक, बबनराव इंगळे सचिव कृउबा समिती वाशिम, चितलांगे गॅस एजन्सी मंगरुळपीर, गजानन ऑप्टीकल स्टेट बँक समोर, अनसिंग, जाजु मेडीकल शेलुबाजार या ठिकाणी नेत्रतपासणीच्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर मोतीबिंदु शस्त्रक्रिया महागडी असली तरी शिबीरात पुर्णपणे मोफत होणार असून ही शस्त्रक्रिया आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट म्हणून गणल्या गेेलेल्या उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय उदगिर येथे केली जाणार आहे. रुग्णांनी शिबीरात येतांना आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक असून निवड झालेल्यांना उदगिर जाणे-येणे प्रवास, भोजन, राहणे, शस्त्रक्रिया, लेन्स व चष्मा आदी सुविधा पुर्णपणे मोफत पुरविल्या जातील. तरी जिल्हयातील गरजु रुग्णांनी या भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन माजी जि.प. सदस्य तथा जिल्हा सहकारी बँकेचे माजी संचालक राजुभाऊ चौधरी यांनी केेले आहे.

Post a Comment

0 Comments