Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर नगरपरिषद चे गलथान कारभारामुळे उद्भवणार्‍या समस्या कधी सुटनार इरफान शेख


मंगरूळपीर 
 :-स्थानिक नागरिकांना आता मुलभुत गरजा पुरवन्यात नगर परिषद ही अपयशी ठरत आहे, याचे नेमके कारण काय तर येथे असनारा एक वेगळाच प्रभाव आजरोजी सुद्धा येथे कार्यरत आहे आणि प्रशासक व मुख्याधिकारी हे त्यांच्याच काणफुकीने आपले "मस्त" चालु आहे अश्या पद्धतीने काम करत असल्याने या नगर परिषदेचा आता कुणीच वाली नसल्याने, सध्या शहरात समस्यांचा डोंगर माजल्याच्या चर्चा प्रत्येक चौकात ऐकाला मीळत असुन जिल्हाधिकारी साहेब यांनी स्वतः या नगर परिषद चा कार्यभार आपल्या हातात घ्यावा व नागरिकांना मुलभुत गरजा पुरवाव्या अशी मागणी जोर धरत आहे

शहरातील समाजिक कार्यकर्ते तथा काही नगरसेवक ज्यांना यापुर्वी सत्येतुन दुर ठेवले व त्या प्रभागाचा विकास झाला नाही, तर प्रभागात अनेक समस्या ह्या डोक वर काढुण पाहत आहे, सध्या परिस्थितीत पाण्या सह स्वच्छता व आरोग्याचे प्रश्न भेडसावत असल्याने अश्या गंभीर बाबीवर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी लक्ष देऊन सामान्य नागरिकाला मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी यापुढे आंदोलन करण्यात येनार असल्याचे बोलल्या जात आहे, या सबब विभागातील सबंधित अधिकारी हे येथील मुख्याधिकारी व ऊप विभागीय अधिकारी यांच्या बेतुकी धोरनाने नागरीकांच्या मुलभुत गरजा पुरवन्यात असमर्थ ठरत आहे, सामान्य नागरिकाला मूलभूत सुविधा पासून वंचित ठेवण्याचा कारस्थानं करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे ही या काळाची गरज असल्याचे समाज सेवक तथा नगर सेवक अनिल गावंडे व शेख इरफान यांनी वेळोवेळी लक्षात आणुन दिले मात्र मुख्याधिकारी हे नेमलेल्या खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून आपले हीत साधत असल्याच्या चर्चा ह्या नप कार्यालय परिसरात खुद काही कर्मचारी गुणगुनावत असता ते या शहराच्या समस्या काय जाणतील तरी येत्या काळात जर तातडीने शहरातील समस्या निकाली काढाव्या
वारंवार निवेदन व तक्रारी देऊनही निवारण करण्याचा विसर पडत आहे आणी शासनाच्या योजनेचा लाभ  नसल्यामुळे लोकांमध्ये नाराजी पसरलेली आहे ,दलित वस्ती चे अनेक नागरिक मूलभूत सुविधा पासून वंचित  करण्याचा षड्यंत्र रचणार्‍या अधिकारी व कर्मचारी दलित वस्तीतील अनेक समस्या असताना, समस्याचा निवारा करण्यास अक्षम्य दुर्लक्ष करत असल्यामुळे न्याय कुणाकडे मागाव माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना नम्र विनंती  करतो कि येणारा 4. एप्रिल  2022 रोजी पासून रमजान महिना सुरू होत असल्यामुळे तातडीने ह्या समस्या निकाली काढाव्यात अन्यथा मोठे आंदोलन ऊभारू असाही निवेदनात   समाजसेवक इरफान शेख यांच्या चर्चा रंगु लागल्यात जनसामान्यांच्या सेवेसाठी अन्नत्याग आंदोलन करावे लागले तरी चालेल

Post a Comment

0 Comments