मानोरा पोलीस स्टेशन हद्दीत विठोली येथील निलेश साहेबराव पाटील यांच्या शेतातून तीन क्विंटल साठ किलो तूर चोरी करणारे चोरटे डी.बी. पथकाने जेरबंद केले. न्यायालय समोर उभे केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती ठाणेदार सुनील जाधव यांनी दिली.
पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती नुसार मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विठोली येथील निलेश साहेबराव पाटील यांनी ता १९ जानेवारी ला गट नंबर ५७४ या तेरा एकर शेतातील तूर मोडून पन्नास कटे तूर ट्रक्टरच्या ट्रालित आणून गट क्र ३९९ शेतात आणून ट्राली उभी केली त्या नंतर पुन्हा उर्वरित शेतातील तूर कापून यातील ३२ कटे तूर पुन्हा ट्रालीत ठेवण्यात आली. २४ जानेवारी ला रात्री बारा वाजल्या नंतर दिग्रस येथील तीन चोरटे तूर चोरून नेताना शेतात रखवाली करिता असलेले अंकुश पाटील गणेश राजहंस व अभिजित बारसे यांचे लक्षात आल्याने अंकुश पाटील यांनी निलेश पाटील यांना फोन करून बोलाविले व शेख साबीर शेख नसीर यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपी शेख नसीर यांना पोलिसांनी हिसका दाखविताच ता १९ जानेवारी ला सहा कटे तूर तीघानी ट्रक्टर व मोटारसायकलच्या साहाय्याने नेल्याची कबुली दिल्याने डी बी पथकाने सापळा रचून गवळीपुरा दिग्रस मधून कुदुस शहा मजीद शहा व इम्रान उस्मान नागपुरे यांना अटक करून त्यांनी चोरून नेले ली तीन क्विंटल साठ किलो तूर हस्तगत केली त्याची किंमत बाजार भाव प्रणाने १५ हजार ६०० रुपये होते. तीन आरोपी यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आह .
0 Comments