वाशिम,दि.२३ भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचे योगदान देणारे भारतमातेचे सुपुत्र क्रांतिकारक शहीद भगतसिंग,राजगुरू,सुखदेव यांना आज 23 मार्च रोजी शहीद दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात अभिवादन करण्यात आले.
कार्यालयाचे अधीक्षक डॉ. राहुल वानखडे यांनी शहिदांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी वाशिम तहसीलदार विजय साळवे,श्रीमती सोनोने, माजी सैनिक संतोष बहीवार,सुवर्णा सुर्वे, शितल पावडे आदी कर्मचारी उपस्थित होते.उपस्थितांनी सुध्दा प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
0 Comments