🇮🇳 केंद्र सरकार व राज्य सरकार विज क्षेत्राचे करीत असलेल्या खाजगीकरणाचे विरोधात विज कर्मचारी अभियंते अधिकारी संघर्ष समिती व कंत्राटी कामगार संघटना कृती समितीचे वतीने विद्युत भवन समोर 25 मार्च रोजी सायंकाळी जोरदार निदर्शने व नारेबाजी करून व्दारसभा घेण्यात आली. खाजगीकरण धोरण व कॉमन मिनीमम प्रोग्राम प्रश्नाकरीता वरीष्ठ कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक झाली त्यात ठरल्यानुसार विद्युत क्षेत्राचे खाजगीकरण होवू द्यायचे नाही,
जलविद्युत केंद्रांचे खाजगीकरण, तिन्ही विज कंपन्यामधील कंत्राटी कामगार यांना वयाचे 60 वर्षांपर्यंत संरक्षण देणे यासह विद्युत बिल 2021ला तीव्र विरोध ,बदली धोरण, कामगार भर्ती करीता 28 व 29 मार्च रोजी संप करण्याचे आदेश ठरले आहे त्यानुसार वाशिम जिल्ह्यातून 100% सहभाग देण्याचा निर्णय व्दारसभेत घेण्यात आला.व्दारसभेचे संचालन एम एस ई बी वर्कर्स फेडरेशनचे जी व्ही भारस्कर (सर्कल सचिव)यांनी तर आभार प्रदर्शन एन आर घुगे (विभागीय सचिव) यांनी केले. द्वारसभेमधे एस ई ए चे एस एस जयपूरकर (सर्कल सचिव), व्ही डी क्षीरसागर (सर्कल अध्यक्ष) डि टी ठाकरे ,विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे (1029)चे गणेश गंगावणे (राज्य उपाध्यक्ष) प्रकाश ठाकरे (सर्कल सचिव) स्वाभिमानी कामगार युनियनचे एस एस गोरे (केंद्रीय सदस्य)रवि आवटे (सर्कल सचिव) मंगेश शेगावकर (सर्कल अध्यक्ष) तसेच तांत्रिक कामगार युनियन (5059)चे विनायक मुठाळ (विभागीय सचिव) विशाल चव्हाण (विभागीय अध्यक्ष)व स्वतंत्र बहूजन विज कर्मचारी संघटनेचे पी एच माळी आदींची मार्गदर्शन भाषणे झाली. द्वारसभेला एस यु पठाण,ए एस नवरे,एस बी देसले,व्ही व्ही हेडावू , एम पी देशमुख,रुपेश इढोळे,मोईन खान,सुरेश शेळके, सतिष कोठूळे, गजानन कावरखे, गणेश घुगे,हेमंत नेमाडे,रोमील घुले, बालाजी गटलेवार,एस जी सावके, ओम बासोळे,सचिन पोहेकर, एस एम जामनिक,एस सी खंडारे, सचिन नेमाने,एस डब्ल्यु पवार,एल डी गोळे, एम के तट्टू,पी व्ही दळवी,व्ही जे गायकवाड,एस पी गुप्ता यांचेसह बहूसंख्य कर्मचारी/सभासद हजर होते. जोरदार घोषणाबाजी करुन व निषेध नोंदवून द्वारसभेची सांगता करण्यात आली.
0 Comments