Ticker

6/recent/ticker-posts

अंधश्रद्धा हा समाजाला लागलेला कलंक आहे- प्रा. जयंतराव हेलोडे

          
 स्थानिक. रिसोड येथील स्व.पुष्‍पादेवी पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सवड येथील विशेष शिबिरामध्ये बौद्धिक सत्राचे आयोजन शिवनेरी ग्रुप करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्रा.के.वि.कोकाटे ,प्रमुख अतिथी म्हणून प्रा.जयंतराव हेलोडे, डॉ.बि. आर.तनपुरे यांची उपस्थिती होती. अंधश्रद्धा ही समाजव्यवस्थेला लागलेली किड असून मानसिक विकलांगता म्हणजेच अंधश्रद्धा होय . मनाची शुद्धता हीच अंधश्रद्धेवर मात होय असे विचार प्रा. जयंतराव हेलोडे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
 डॉ. बी आर तनपुरे यांनी 'आजादी का अमृत महोत्सव' या विषयावर बोलताना गांधी ते मोदी इथपर्यंतचा इतिहास अतिशय सखोलपणे, चिंतनशील पद्धतीने उलगडून दाखवला. राजकीय ,सामाजिक ,धार्मिक अशा सर्वच बाबींचा त्यामध्ये ऊहापोह केला.  प्रा के.वि.कोकाटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून  विद्यार्थ्यांनी  अतिथींचे अनमोल विचार विद्यार्थ्यांनी अंगीकृत करून राष्ट्राची सेवा करावी असे विचार व्यक्त केले.रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.टी.सी.भोयर, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.आम्रपाली भगत या प्रसंगी उपस्थित होते .             कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर भोपाळे कु. शिल्पा जाधव, प्रास्ताविक महेश अंभोरे , स्वागत गीत कु.आदिती व्यास, परीचय सुमेत भगत, आभार प्रदर्शन कु. जयश्री शिंदे, या विद्यार्थ्यांनी केले.

Post a Comment

0 Comments