कारंजा (लाड) :
विविध कार्यकारी सोसायटी कारंजाच्या संचालकपदी सातव्यांदा छट्टु पिरू शेकुवाले यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. सन १९८३ पासून त्यांची निवड बिनविरोध करण्यात येत आहे. सुशिक्षित व सुसंस्कार व्यक्तीमत्वाचे धनी असल्याने शेकूवाले यांच्या विरोधात कोणीही उमेदवारी अर्ज दाखल करीत नाही. त्यांनी या अगोदर नगर पालिकेत उपाध्यक्ष पदासह विविध विभागाचे सभापती पद यशस्वीपणे भूषविले आहे. त्यांच्या निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. असे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे .
0 Comments