Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस कल्याण उपक्रमा अंतर्गत असलेल्या दक्षता पेट्रोल पंपाला HPCL कंपनी कडुन उत्कृष्ट कामगीरी बद्दल पुरस्कार

वाशिम जिल्हा पोलीस घटकात पोलीस कल्याण अंतर्गत भरपुर उपक्रम राबविण्यात येतात. त्या पैकी सर्वात महत्वाचा उपक्रम म्हणजे दक्षता पेट्रोल पंप हा आहे. २६ जानेवारी २०२० रोजी जुने पोलीस मुख्यालय येथील जागे मध्ये सदर चा पेट्रोल पंप स्थापीत करण्यात आला. दक्षता पेट्रोल पंप हा HPCL कंपनीचा आहे.

मा. पोलीस अधिक्षक वाशिम यांच्या संकल्पनेतुन वाशिम शहरा मध्ये सर्व प्रथम महीला कर्मचारी नेमण्यात आलेला दक्षता पेट्रोल पंप नावारूपाला आला. मागिल दोन वर्षात चालु करण्यात आलेला दक्षता पेट्रोल पंप वाशिम शहरामध्ये वाशिमकरांना सेवा व सुविधा देत आहे. त्यामुळे वाशिम शहरातील लोकांना दक्षता पेट्रोल पंप वर भरपुर विश्वास दाखवुन उस्फुर्त प्रतीसाद दिला. त्यामुळे पेट्रोल पंप मधील पेट्रोल व डीझल यांची मोठ्या प्रमाणात विक्री होवु लागली. सदर दक्षता पेट्रोल पंप ची सेवा, सुविधा व विक्री पाहता HPCL कंपनीने औरंगाबाद विगाभा मधुन वाशिम मंघिल दक्षता पेट्रोल पंप ला उत्कृष्ट कामगीरी बद्दल ट्रॉफी देवुन गौरविण्यात आले. दक्षता पेट्रोल पंप वर एकुन १४ कर्मचारी कार्यान्वीत आहेत. त्यापैकी ०३ महीला व ११ पुरुष कर्मचारी आहेत. दक्षता पेट्रोल पंप चे कामकाज सकाळी ०६/०० ते दुपारी ०२/०० वाजे पर्यंत व दुपारी ०२/०० ते रात्री ०९/०० वाजे पर्यंत आणि रात्री ०९/०० ते सकाळी ०६/०० वाजे पर्यंत अश्या तिन शिफ्ट मध्ये चालते. सर्व कर्मचारी हे उत्कृष्ट सेवा देत आहेत.

मा. बच्चन सिंह पोलीस अधिक्षक वाशिम यांनी दक्षता पेट्रोल पंप येथील कामकाग पाहणारे पोनी, ब्रम्हदेव शेळके, सपोउपनी / ४३९ रमेश तायडे, पोहवा / ९६ संतोष आंधळे, पोअंम / १४०८ दिलीप देवकर, पोअंम / १०६६ बाबाराव बेलखेडे, तसेच कल्याण शाखेतील सपोउपनी / ५५३ दिलीप घोडाम, मपोहवा / ०७ बेबी राठोड, पोना / १०४५ प्रविन शिरसाट वरीष्ट श्रेणी लीपीक वर्षा गायकवाड़ यांचे कैतुक केले. तसेच वाशिमकरांनी पोलीस विभागावर टाकलेला विश्वासाचे सुद्धा मा. पोलीस अधिक्षक साहेब यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments