प्रतिनिधी:-
सचिन राणे, शेलुबाजार
आदर्श ग्राम वनोजा येथिल श्रीमती साळुंकाबाई राऊत महाविद्यालयात महिला सक्षमीकरण कक्षा मार्फत विद्यार्थिनीं नि पक्षी वाचवा, निसर्ग वाचवा असा संदेश असलेले मातीचे जलपात्र जेथे पक्षी नित्यनेमाने येतात. अशा ठिकाणी पक्ष्यांसाठी मातीचे जलपात्र झाडांवर लावण्याचा उपक्रम राबविला,
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देवेंद्र गावंडे यांनी जलपात्र झाडावर लावून या उपक्रमाचा शुभारंभ केला, व या प्रसंगी आपले विचार व्यक्त केले. गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. परिसरातील पाण्याचे स्रोत आता आटले असल्याने पक्ष्यांना पाणी मिळेनासे झाले आहे. तहानलेल्या पक्ष्यांकरिता पाण्याची सोय करावी, या हेतूने या तप्त उन्हात पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करून त्यांचा जीव वाचवू या... असे मार्गदर्शन पर विचार व्यक्त करून विद्यार्थीनी चे कौतुक केले.
याप्रसंगी महिला सक्षमीकरण कक्ष समन्वयक प्रा डॉ ममता पाथ्रीकर,प्रा प्रकाश लहासे, डॉ सचिन कडू, प्रा जयाप्रभा भगत, प्रा दीपक भगत,प्रा. गजानन मिसाळ व 39 विद्यार्थिनी उपस्थित होत्या. हा उपक्रम राबविण्या साठी कु अंजली सोनोने कु. वैष्णवी पाटील, कु तृप्ती जिंकटवर, कु पूनम राऊत कु मंजूशा इंगोले, कु. वैष्णवी राऊत ,प्रथम जिंकटवर, आदित्य इंगोले यांनी परिश्रम घेतले.
0 Comments