पुर्णतः नाही पण काही प्रमाणात का होईना राजकारणावर हमखास प्रभाव टाकणारा विशिष्ट असा ' कृती आराखडा ' आपल्याकडे तयार असेल तरच आपला संकल्पित विकासात्मक कार्यक्रम अंमलात आणणे सहज शक्य होत असते . २०२४ मधिल विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमधिल काही निवडक २० जागांच्या निकालावर परिणाम घडवून आणण्याची क्षमता असण्याची तजवीज आम्ही तयार करून ठेवलेली आहे . तिच्या प्रारूपाची झलक आम्ही काही महिन्यांपूर्वीच दाखवून सुध्दा दिलेली होती . जसा जाहीरनामा , करारनामा , वचननामा असतो त्याच धर्तीवर आमचा हा , ' सत्ताभेदी युक्तीनामा ' आहे . त्याचे विस्ताराने स्पष्टीकरण करणारा आजचा हा ' वाच्यता दिवस ' होय . प्रस्तूत मांडणी लेखाच्या शिर्षकावरूनच कुणाच्याही सहज लक्षात येऊ शकेल की , हा सत्ताकारणावर काहीतरी छेडछाड करण्याचा प्रकार आहे . तर लपवून न ठेवता आम्ही सुध्दा अगदी खुलेपणाने स्पष्टच शब्दात सांगू इच्छितो होय आमचा हा सर्व खटाटोप तोच आहे . आमची " लेकीबाळी अब्रूरक्षा क्रांतीबंड " ही सामाजिक संघटना आहे .ही संघटना महिलांच्या प्रश्नांवर काम करते . महिलांवरील लैंगिक हिंसाचार किंवा तत्सम अन्य मुद्द्यांबाबत ही संघटना वेळोवेळी जमेल तशी भूमिका घेत आलेली आहे . १२ जानेवारी २०२२ पासून ' विघपदिपी ' म्हणजेच ( विधवा , घटस्फोटित , परित्यक्ता , दिव्यांग , पीडिता ) या दुर्लक्षित पंचम घटकांसाठींचे ' नारीजोड अभियान ' सुरू करून त्याची व्याप्ती महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांपर्यंत पोहोचवली आहे .
हे काम करत असताना या विघपदिपी महिलांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या समस्या आमच्या निदर्शनास आल्यात . मग त्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी काहीतरी ठोस उपाययोजना आखल्या पाहिजेत हा विचार डोक्यामध्ये घोंगावू लागलाय . त्याचाच परिपाक म्हणून विघपदिपी महिला व त्यांचे कुटुंबातील बेरोजगार युवाजन यांच्या विकासाला प्राधान्य देणारे धोरण जन्मला आले . कोणताही विकासात्मक कृती कार्यक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्यकर्ते हे सहजासहजी तयारी दाखवत नसतात हे वास्तव लक्षात घेऊनच दबावगट स्वरूप एखादा तसा कार्यक्रम हाती घेणे आवश्यक झाले होते . म्हणूनच
२७ पैकी निवडक २० जिल्ह्यांवर जास्त जोर देत त्यात आणखी विधानसभेच्या निवडक २० मतदारसंघावरच विशेष लक्ष केंद्रीत करण्याचा बेत आखण्यात आला .
एका विधानसभेच्या मतदारसंघामध्ये साधारणपणे महिला मतदारांची दीड लाख एवढी मतसंख्या असते त्यापैकी विघपदिपी महिला व त्यांचे कुटुंबातील बेरोजगार युवाजन हे दोन्ही मिळून १०% एवढी मतदार संख्या निघते . १०% नुसार ती मतसंख्या होते १५ ,००० ( पंधरा हजार ) एवढी होते . ही मतदारसंख्या केवळ अंदाजित नसून ती आमच्या खास सर्वेक्षणाव्दारे आम्ही प्राप्त केलेली आहे . म्हणूनच हा आकडा तंतोतंत असल्याचे आम्ही ठासून सांंगत आहोत . याचमुळे " त्या " २० विधानसभा मतदारसंघातील निकालांचे अचूक गणित आम्ही १५ ,००० मत संख्येच्या भरोशावर आम्ही हवे तसे बदलवू शकतो . एका जिल्ह्यामध्ये सरासरी ३ विधानसभा मतदारसंघ पकडल्यास ( गृहीत धरल्यास ) ती संख्या २० × ३ = ६० अशी होते . म्हणूनच २० विधानसभेच्या मतदारसंघातील निकालाच्या जय -- पराजयाची हमी आमच्याकडे सुरक्षित राहाते . तर उर्वरित ४० मतदारसंघामध्ये फक्त २% मते म्हणजेच ३ हजार मते फिरविण्याची ताकद सुध्दा आमच्याकडे अबादीत राहते . हे काम आम्ही जवळपास ७५ % पुर्ण केलेले आहे . आमचे प्रस्तुत " महिला उत्थान धोरण " अंमलात आणण्यासाठी जो राजकीय पक्ष अनुकुलता दाखवेल त्याच्याच बाजूने उभे राहण्याचा प्रयत्न असेल . तसे पाहिले तर निवडणुकीच्या निकालावर परिणाम घडवून आणणारा असला प्रभावशाली कार्यक्रम उघड करायला नको असे , कुणीही म्हणेल . पण सर्वच राजकीय पक्षांना आमच्या संभाव्य महिला उत्थान धोरणाची गंभीरता कळायला हवी म्हणूनच आम्ही उघडपणे हे स्पष्ट करून सांगण्याचा मार्ग निवडलेला आहे . हाच आमचा या मागचा सूप्त हेतू आहे . हे आम्ही लपवून ठेवत नाही . विधानसभेच्या २० जागेवरील हार -- जीत करून देणारी आमची ही भूमिका निर्विवादपणे बजावली जाणार असल्यामुळेच आमच्या असल्या या भूमिकेकडे दुर्लक्ष करणे निश्चितच कुण्याही राजकीय पक्षाला परवडणारे नाही . राजकीय दबावतंत्राचा हेतू निर्देश करताना आजच्या या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून त्या निमित्त सर्वांना शुभेच्छा देत हा ' सत्ताभेदी युक्तीनामा ' विधानसभेच्या २० मतदारसंघामध्ये जय - पराजयाच्या बदलाची नांदी ठरण्याबरोबरच ' डावपेचात्मक जनस्वाधीन ' कार्याचा खुला संदेश फैलावणार आहे .
गंगाधर कांबळे
मुख्य संयोजक
( लेकीबाळी अब्रूरक्षा क्रांतीबंड )
मो. नं. ९५०३८५७९९८
0 Comments