-रिसोड येथील स्व. पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयात संस्थाध्यक्ष मा. बाबाराव पाटील, सचिव मा.अमित पाटील, कार्यकारी अधिकारी डॉ. जे बी.देव्हडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा व 'शिवराय ते भिमराय एक वैचारिक वारसा'या विषयावर डॉ. किशोर इंगोले यांचे अतिथी व्याख्यान आयोजन करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.आदिनाथ बदर हे होते. याप्रसंगी मंचावर प्रा सुमेध कांबळे , कु. छाया खिल्लारे, प्रा.टि.शी.भोयर प्रा.केशव कोकाटे यांची उपस्थिती होती.वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची रितसर सुरुवात करण्यात आली.
आपल्या अतिथी व्याख्यानांमधून मार्गदर्शन करताना डॉ. किशोर इंगोले यांनी निकोप समाज निर्माण होणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असल्याचे सांगताना संत तुकोबा ते भीमराया पर्यंतच्या विचारांचा आढावा घेत प्रयत्नवाद आणि विज्ञानवाद हा जर स्वीकारला तर निश्चितच निरोगी समाज तयार होईल असे मत प्रतिपादन केले. प्राचार्य डॉ.आदिनाथ बदर यांनी अध्यक्षीय भाषणातून भेद निर्माण करणारी कामे वगळून विधायक कामाला महत्त्व द्यावे, व विचाराने पेटलेली माणसे निर्माण व्हावीत असे विचार व्यक्त केले.
'डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक व सामाजिक विचार 'या विषयावरील वक्तृत्त्व स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील 23 यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु पायल जाधव, प्रास्ताविक प्रा. सिद्धार्थ इंगोले आभारप्रदर्शन प्रा. केशव कोकाटे यांनी केले. या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Comments