मंगरुळपीर नगर परिषद
कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहो. या संदर्भातील निवेदन नगरपरिषद व संवर्ग कर्मचारी संघटना यांचे वतीने मुख्यमंत्री, नगर विकास मंत्री, नगरविकास सचिव, आयुक्त तथा संचालक नगरपालिका प्रशासन मुंबई यांना दिले आहे.
निवेदनामध्ये नमूद केले आहे की, राज्यातील नगर परिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन कोषागारात व्हावे, नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे समावेशन सरसकट
व्हावे, सर्व सफाई कर्मचाऱ्यांची पदे वाढून ठेकेदारी पद्धत बंद करण्यात यावी, कर्मचाऱ्यांना नगरपंचायतीच्या पदोन्नतीची संधी उपलब्ध करून देऊन वेतन श्रेणी मध्ये वाढ करण्यात यावी, राज्यसेवा संवर्गातील कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी एकसमान करण्यात यावी यामध्ये स्वच्छता निरीक्षक, कर व प्रशासकीय सेवा, अग्निशमन सेवा यांची वेतनश्रेणी २८०० वरून ४२०० करण्यात याव विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या ज्येष्ठता यादी तात्काळ प्रसिद्ध करून ज्येष्ठतेनुसार रखडलेल्या पदोन्नत्या देण्यात याव्यात, मुख्य तात्काळ अधिकारी पदावरील संवर्गातील कर्मचारी यांना पदोन्नतीच्या संधी देणेसाठी १० टक्के ऐवजी ५० टक्के अशी पदनिर्मिती करण्यात यावी आणि अन्य मागण्यासाठी संघटनेने तीन टप्प्यात आंदोलन पुकारले आहे. त्यानुसार १ मे पासून मंगरूळपीर न.प. मधील ९८ कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती
संघटना पदाधिकारी-- राजेश खंडेतोड, रामचरण खोडे ,नरसिंग चरावनडे,
धनंजय खंडेतोड, गणेश खोडे, मोहन संगत, कैलास टांक, सय्यद हमिद, राजेश संगत, दिनेश व्यास, रमेश नाकाडे, अनिल चव्हाण, विलास धोपटे, गजानन तिडके, इरफान खान , रामभाऊ मिसाळ, मोहम्मद कशफुलवरा, कैलास टाँक, रमेश शृंगारे ,रमेश नाकाडे , सय्यद हमीद ,दिनेश व्यास ,गजानन तिडके ,विलास धोपटे ,इरफान खान ,सुरेश ठक, दीपक भगत ,अनिल चव्हाण ,धर्मेंद्र गुप्ता, विठ्ठल राठोड ,निलेश भोयर, कैलाश मेठवाणी ,शरद इंगोले, गणेश गायकवाड, गोपाल शिरसागर ,माणिक भोंगळे ,विजय खोडे,नंदू बोरकर, भिडिकर,इत्यादि पदाधिकारी व कर्मचारी
0 Comments