Ticker

6/recent/ticker-posts

लगीनसराईत वाघ्यामुरळीच्या खंडोबा गोंधळ जागरण कार्यक्रमाला वाढती मागणी !

     

  कारंजा (लाड) : कोव्हिड 19 कोरोनाचे सावट 100 % संपल्यामुळे, महाराष्ट्र शासनाने कोरोनाचे सर्वच प्रतिबंध मागे घेतलेले आहेत . त्यामुळे लग्नाचा हंगाम असल्यामुळे, अगदी धार्मिक व पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे धुमधडाक्यात विवाह होतांना दिसत आहेत .
 सर्वसाधारणपणे हिंदु धर्मियांचे कुळदैवत म्हणजे श्रीक्षेत्र तुळजापूरची श्री तुळजा भवानी, श्रीक्षेत्र जेजुरगडचे खंडेराया किंवा मल्हारी मार्तंड - बानू म्हाळसा, श्रीक्षेत्र पालेपिंपळचे ज्योतिबा राया, श्रीक्षेत्र बहिरमचे बहिरीनाथ असून या देवाला पारंपारिक लोककलावंत गोंधळी - वाघ्यामुरळी यांचेकडून गोंधळ - जागरण घालवून, नववधू किंवा नवरदेवाला हळद लागण्यापूर्वी कुळदैवताला भंडारा (हळद) देण्याची व गोंधळ जागरणामध्ये दिवटी (मशाल)
 प्रज्वलीत करून त्यावर तेल जाळून देवाला प्रसन्न करून घेण्याची प्रथा असते . त्यामुळे सध्या संपूर्ण विदर्भासह कारंजा पंचक्रोशीत 'गोंधळ - जागरण' कार्यक्रमाला उधाण आलं असून ,कारंजा येथील महाराष्ट्र शासन प्राप्त गोंधळी लोककलावंत, संजय कडोळे यांच्या जय भवानी जय मल्हार गोंधळ जागरण कला संचाला वाढती मागणी येत आहे .

Post a Comment

0 Comments