Ticker

6/recent/ticker-posts

सामाजिक सलोखा उत्तम राहल्यास शहरासह राज्याचा व देशाचा विकास शक्य - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील



 । कारंजा (लाड) 
समाजात छोट्या छोट्या मुद्द्यावरून धार्मिक व जातीय तेढ़ निर्माण करून सद्या देशात दुही माजवण्याचे काम काही राजकिय लोकांकडून सुरू आहे. आपण या बाबींकडे दुर्लक्ष करून सामाजिक बांधिलकी निर्माण करावी. कारण सामाजिक सलोखा उत्तम राहिल्यास शहरासह राज्य व देशाचा विकास शक्य आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री नामदार दिलीप वलसे पाटील यांनी केले आहे. कांरजा-मानोरा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती स्व.प्रकाश दादा डहाके यांच्या प्रथम स्मृतीदिन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
      कारंजा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परीसरात १० मे रोजी सकाळी १० वाजता माजी आमदार प्रकाश डहाके यांचा प्रथम स्मृतिदिन
कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन शिक्षणराज्य मंत्री बच्चु कडु, आमदार अमोल मिटकरी, आमदार अमित झनक, माजी आमदार गोपिकीशन बजोरीया, माजी राज्यमंत्री गूलाबरावजी गांवडे, राष्ट्रवादीचे वाशिम जिल्हाध्यक्ष तथा जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,माजी जिल्हाध्यक्ष बाबारावजी खडसे आणि राष्ट्रवादीचे नेते मो. युसुफ पुजांनी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती हेाती. पुढे बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, स्व. प्रकाशदादा डहाके यांना कांरजा तालुक्यातील सर्व समावेशक विकास कामे करण्यास अल्प कालवधी मिळाल्याने अनेक प्रकल्प अपुर्ण राहीले ते प्रकल्प पुर्ण करण्यासाठी सामाजिक सलोखा उत्तम राखणे गरजेचे असल्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले. शिवाय आपल्या मनोगतात राज्यात सध्या सुरू असलेल्या परीस्थितीवर भाष्य करताना त्यांनी समाजासमाजात फुट निर्माण कारणाऱ्यांपासून सावध राहुन आपले शहर व समाज कसा सुरक्षित ठेवता येईल याचा विचार करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमात मो.युसूफ पुंजानी, बाबाराव खडसे, चंद्रकांत ठाकरे, माजी आमदार गोपीकीसन बाजोरिया, आ.अमोल मिटकरी,आ.अमित झनक, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या मनोगतातुन स्व.प्रकाश डहाकेंच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहीली. या कार्यक्रमास कारंजा तालुक्यासह इतर तालुक्यातील व जिल्ह्यातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौतुभ डहाके यांनी व्यक्त केले तर संचालन माजी नगरसेवक प्रसन्न पडसकर,अनिल मस्के व आशिष बंड यांनी केले व आभार देवव्रत डहाके यांनी मानले. कार्यक्रमाचे समारोप स्व.प्रकाशदादा डहाके यांना संगीतमय श्रध्दांजली देऊन करण्यात आले. 
स्व.प्रकाश डहाके यांच्या विकास स्वप्नपुर्तीसाठी सदैव सहकार्य करणार - गृहमंत्री वळसे पाटील

प्रथम स्मृतीदिन कार्यक्रमादरम्यान माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या आठवनणींना उजाळा देत म्हणाले की, शहराच्या विकासासाठी झटणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. इंजिनिअर ची नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला. नेहमी ते विकासात्मक कामासाठी माझ्याकडे यायचे व योग्य पाठपुरावा करायचे. त्यांनी कारंजा शहरासाठी खूप स्वप्न पाहिले होते. त्यांच्या विकास स्वप्नपुर्तीसाठी सदैव सहकार्य करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच डहाके कुटूंबिय व युसूफ पुंजानी यांनी सोबत राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करावा व पुंजानी हे स्थानिक पातळीवरील मोठे नेतृत्व असल्याचे ही ते म्हणाले. 



Post a Comment

0 Comments