Ticker

6/recent/ticker-posts

प्राचार्यांची मान्यता काढून घेतल्याबाबतशिक्षण राज्यमंत्री आदरणीय बच्चू भाऊ कडू महाराष्ट्र राज्य मुंबई यांना दिले निवेदन

 

निवेदनातील विषय:- कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्राचार्यांची मान्यता काढून घेतल्याबाबत

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने, भुसावळ येथील महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंगला सावद्रा यांची प्राचार्यपदाची मान्यता 2019 मध्ये काढून घेतलेली आहे. या कारवाई विरुद्ध संबंधित प्राचार्य आणि संस्थेने मिळून उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ याठिकाणी याचिका क्रमांक 523/2020 दाखल केलेली आहे. सदर याचिका कोर्टात चालविताना विद्यापीठाचे वकील व सरकारी वकील याचिका चालवण्यासाठी जाणून बुजून दिरंगाई करीत आहे. प्राचार्यपदाची मान्यता काढल्यामुळे हा विषय शासकीय निधीशी संबंधित आहे शासनाचे करोडो रुपये या बेकायदेशिर नियुक्त्याव खर्ची पडत आहे त्यामुळे मी आपणास विनंती करतो की सदरची याचिका फास्ट ट्रैक कोर्टात चालवून ताबडतोब निर्णय होईल अशी व्यवस्था करून द्यावी अशी विनंती. निवेदनात करण्यात आली आहे

तसेच उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ या ठिकाणी जनहित याचिका क्रमांक 23/2017 बन्याच दिवसापासून निर्णयासाठी प्रलंबित आहे या ठिकाणी देखील संबंधित विद्यापीठाचे वकील व सरकारी वकील याचिका चालविण्यास दिरंगाई करीत आहे. विशेष बाब म्हणजे या दोन्ही प्रकरणात विद्यापिठाने चौकशी समिती नेमुन वस्तुनिष्ठ, सत्य व कायदेशीर बाबी लक्षात घेवुन अहवाल सुध्दा न्यायालयात सादर केलेला आहे!
 दोन्ही याचिका फास्ट ट्रैक कोर्टात चालवून त्वरित निर्णय मिळेल अशी व्यवस्था करावी अशी नम्र विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments