महाराष्ट्र महीला विकास
मंच च्या राज्य समन्वयक कालींदिताई ठुबे पाटील यांनी या संस्थे अंतर्गत विधवा महिला सन्मान कायदा अभियान सुरू केले आहे, महिलांप्रती स्नेह आपुलकी महिलांवर होत असलेल्या अन्याया विरोधात कुठल्याही प्रकारची मनात भीती न बाळगता निर्भीडपणे डोळ्यावरची पट्टी काढण्यासाठी हे अभियान उभारले आहे. त्या अनुशंगाने या अभियानाचा पाठपुरावा करत आदरणीय खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी स्वतः लक्ष देऊन शासन परिपत्रक काढून ते जाहीर केले, ह्या ऐतिहासिक कामगिरी साठी, महाराष्ट्र महीला विकास मंच च्या राज्य महासचिव रेवती ताई , नवी मुंबई यांनी समाजसेवेचा वसा घेऊन चालणाऱ्या महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात झाशीच्या राणीसारखी उभ्या राहणाऱ्या, निस्वार्थपणे जीवाला जीव देणाऱ्या आमच्या महाराष्ट्र महीला विकास मंच च्या राज्य महासचिव रेवती ताई आढाव,जिल्हा अध्यक्ष मीनाताई शेळके, वरिष्ठ उपाध्यक्ष चित्राताई गायकवाड, आणि नंदाताई डेरे, नवी मुंबई जिल्हा महासचिव निषा केदारे, तसेच नवीन सदस्य डॉ. विदया
खंबाळकर, रितिषा साळुंखे आदीनी स्वतः सुप्रियाताईंची भेट घेऊन कृतज्ञता पत्र देऊन अभिनंदन केले व लवकरात लवकर जी आर काढून कायदा करावा अशी आशा व्यक्त केली.आदरणीय खासदार सुप्रिया ताई सुळे. महाराष्ट्र महीला विकास मंच च्या राज्य व्यापी विधवा महिला सन्मान कायद्याचा
लवकर जी आर काढून महिलांना स्वाभिमानाची आणि सन्मानाची वागणूक मिळेल अशी अपेक्षा विदर्भातून आणि महाराष्ट्रातून केली जात आहे.
0 Comments