(अमरावती)अलीकडे राजकीय नेत्यांची कार्य करण्याची पद्धत बदललेली नजरेस पडत आहे. सद्या राजकीय नेत्यांचं स्वागत, सत्कार, स्पर्धा सभा, शक्ती प्रदर्शन, आंदोलनं, पुतळा हनुमान चालीसा,भोंगे आणि खोटे आरोप प्रत्यारोप इत्यादी चे राजकारण जोरात सुरु आहे. ज्या मतदारांनी आपल्याला भरभरुन मते देऊन तूम्हाला निवडून पाठविले ते वरील पद्धतीने राजकारण करण्यासाठी नाही तर जनतेच्या मुलभूत समस्याचे निराकरण व्हावे याकरिता. तसेच मतदार संघाचा विकास व्हावा जनतेचे मुलभूत प्रश्न सुटावेत.मात्र अलिकडे जनतेच्या प्रश्नावर कुणीही बोलण्यास तयार नाही आणि त्यामधे काही राजकीय नेत्यांना रसही नाही. आता सामान्य प्रश्नाबाबत बोलायचे झाले तर गेले बरेच दिवसां पासून अमरावती आणि बडनेरा क्षेत्रात पाण्याची मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झालेली आहे. पाण्यासाठी सामान्य जनतेला तसेच महिलांना वणवण भटकावे लागत आहे. आणि नळ येण्याची चातकासारखी वाट पाहावी लागत आहे कारण नळ येण्याची वेळसुद्धा निश्चित नाही मनात येईल तेव्हा नळ सोडणे आणि मनमानी पध्दतीने बंद करणे ही स्थिती सद्या सुरु आहे. काही दिवसांपूर्वी मजिप्रा सोबत क्षेय घेण्याच्या दृष्टीने मिटींगा घेण्यात आल्या त्यांना दिशानिर्देश अल्टीमेटम देण्यात आले. परंतु परत कोणत्याही नेत्याने फालोआॅप घेतला नाही की शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी तरी मिळत आहे काय ❔उलट त्यानंतर पाण्याची टंचाई उलट जास्त सुरु झाली, नळ येण्याचा टायमिंग राहिला नाही. नळाची वाट पाहण्याकरीता महीलांना इतर कामे बंद ठेवावी लागतात ही स्थिती आज असली तरी कुणालाही या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी वेळ नाही. आज वास्तविक स्थिति पाहिली तर अमरावती बडनेरा शहरात एक दिवसाआड पाण्याचा पुरवठा होतो. कुठे 15 मिनिटे तर कुठे अर्धा तास नळ येतात. त्यामधे नळांना फोर्स हा बिलकूल नसतो. पिण्याचे पाणी व्हायच्या आधीच नळ निघून जातात
. आता येथे महत्त्वाचे सांगायचे म्हणजे असे कि अमरावती बडनेरा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वर्धा अप्पर धरणात मुबलक पाणि असतांना आणि शेतीकरीता पाणी देत असतांना सुद्धा शहरात मात्र पाण्यासाठी ओरड आणि आंदोलने कां? ऐन उन्हाळ्यातच पाईपलाईन दुरुस्तीची कामे का केली जातात? दुरुस्ती करता दोन दिवस तिन दिवस नळाचा पाणिपूरवठा बंद करून मजिप्रा काय साध्य करीत आहे.नळ दुरस्त करण्यासाठी दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येतो मग तिसर्या दिवशी पाणीपुरवठा एक दोन तास जास्त सोडण्यात कां येत नाही. आपण खुप विकासाच्या गोष्टी करतो परंतु आपला देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण होणार मात्र या 75 वर्षानंतर ही आपण पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत आणि तहानलेल्या स्थितीत राहणार कां? आणि आंदोलनेच करीत राहायचे!ही वास्तव स्थिति असली तरी या समस्याचे
नेहमीकरीता समाधान करण्यात कुणालाही रस दिसत नाही राजकीय नेते फक्त स्वागत, सत्कार, स्पर्धा सभा आरोप प्रत्यारोप, ऐकमेकावर चिखलफेक शक्ती 💪 प्रदर्शन करण्यात फक्त मग्न आहेत त्यांना जनतेच्या (मतदारांच्या) समस्यांवर किंवा पाण्यासारख्या मुलभूत प्रश्नावर कायम तोडगा काढण्यासाठी मात्र वेळ नाही असेच सद्या पहावयास मिळत आहे. मतदारांचा आणि सामान्य जनतेच्या मुलभूत समस्यांचा राजकीय नेत्यांना विसर पडला असेल तर जनता भविष्यात अशा नेत्यांना आपली जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही हे ही तितकेच खरे!
0 Comments