मा. श्री. बच्चन सिंह, पोलीस अधिक्षक यांनी वाशिम जिल्हयातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करून गुन्हेगारांना कायदयाचा चांगलाच बडगा दाखवला आहे. त्याअनुषंगाने पोलीस स्टेशन रिसोड येथील अभिलेखा वरील शरीराविरुध्द तसेच जनमानसात भिती निर्माण करुन, छोटया छोटया कारणा वरुन भांडण करून गावात टोळीने राहुन सर्वसामन्य लोकांना मारहाण करणे, महिला मुलींची छेडछाड करणे अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या वाशिम जिल्हयातील रिसोड शहरातील १) दिपक साहेबराव जुमडे रा. आंबेडेकर नगर रिसोड २) धिरज साहेबराव जुमडे रा आंबेडकर नगर रिसोड ता रिसोड जि वाशिम ३) सतिष साहेबराव जुमडे रा आंबेडकर नगर रिसोड ता रिसोड जि. वाशिम यांचे विरुध्द शरीरा विरुध्द तसेच जनमानसात भिती निर्माण करून छोटया छोटया कारणावरुन भांडण करुन गावात टोळीने राहुन सर्व सामन्य लोकांना मारहाण करणे, महिला मुलींची छेडछाड करणे अशा प्रकारचे गुन्हे करणारे असुन त्यांचे विरुध्द पो. स्टे. रिसोड येथील शरीरा विरुध्द गुन्हे, महिला मुलींची छेडछाड करणे अशा प्रकारचे गुन्हे करणाच्या त्यांच्या कृत्यावर वेळीच आळा बसावा म्हणून त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदा कलम ५९ अन्वये तडीपारीचा प्रस्ताव तयार करून सादर करण्यात आला त्यातडीपार प्रस्तावात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रावरुन व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केलेल्या शिफारशी वरुन मा. श्री. बच्चन सिंह, पोलीस अधिक्षक वाशिम यांनी वाशिम जिल्हयात मुंबई पोलीस कायदा कलम ५५ अन्वये वरील ०३ गुन्हेगारांना वाशिम जिल्हयातून एक वर्षा करीता तडीपार करण्याचे आदेश निर्गमीत केले आहेत. हयापुर्वी मा. श्री बच्चन सिंह यांनी पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारल्यापासून मुंबई पोलीस कायदा कलम ५५ अन्वये कार्यवाही करुन रिसोड शहरातुन एकुण ०५, मंगरुळपीर शहरातुन ११ असे एकुण १६ इसमावर तडीपार आदेश निर्गमित केले असुन गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकांवर अशा प्रकारे कार्यवाही सत्र सुरच राहणार असल्याचा ईशारा पोलीस अधीक्षक यांनी दिला आहे.
तसेच यापुढे ही वाशिम जिल्हयातील गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणारे गुन्हेगारांवर व ज्या गुन्हेगारांवर दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहे अशा गुन्हेगारांची अध्यावत यादी तयार करून त्यावर सुध्दा लवकरात लवकर तडीपार, एमपीडीए व मकोका कायदया अंतर्गत उच्च प्रतीची प्रतिबंधक कार्यवाही करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.
मा. श्री. बच्चन सिंह, पोलीस अधिक्षक वाशिम यांनी वाशिमकर जनतेस असे आवाहन केले आहे की, वाशिम जिल्हयात गंभीर स्वरुपाचे गुन्हेगारांवर पोलीसांचा वचक बसणे गरजेचे असुन, अशा गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या व्यक्ती गुन्हेगारांना मदत करणारे इतर गुन्हेगार यांचे वर्तणुकीत बदल न झाल्यास अशा गुन्हेगार/ टोळीवर अशाच प्रकारची प्रभावी व कठोर कारवाई करण्यता येईल, त्याअनुषंगाने वाशिम जिल्हयातील सर्व क्रियाशिल गुन्हेगारावर श्री बच्चन सिंह, पोलीस अधिक्षक वाशिम, श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधिक्षक वाशिम यांचे नेतृत्वात जनतेच्या सुरक्षिततेसाठी संपुर्ण वाशिम पोलीस कटीबध्द आहेत.
0 Comments