प्रतिनिधी।कारंजा
कारंजा शहरातील संपूर्ण वस्त्यांमध्ये नळाद्वारे होणारा पाणिपुरवाठा पूर्ण दाबाने व दररोज नियमीत करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस नेते हाजी मो युसुफसेठ पुंजानी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.याबाबतीचे निवेदन १९ मे रोजी कारंजा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण शाखाधिकारी यांना देण्यात आले.याबाबत चे सविस्तर असे की,महाराष्ट्र जिवन प्राधिकरण यंत्रणेद्वारे कारंजा शहरामध्ये एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येते, परंतु मजीप्रा मार्फत होणारा पाणी पुरवठा पूर्ण दाबाने होत नसल्यामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी पुरवठा व्यवस्थीत होत नाही परीणामी अनेक घरामध्ये पिण्यासाठी सुध्दा पाणी उपलब्ध होत नाही यामुळे नागरीकांमध्ये असंतोष निर्माण होऊन पाण्यासाठी हाहा कार होत आहे.
सद्या उन्हाळ्याने उग्र रुप धारण केलेले आहे व जमीनी खालील पाण्याची पातळी पूर्णपणे खाली गेली असल्याने अनेक नागरीकांच्या घरातील बोअरवेल पुर्णपणे आटून त्यामधुन सुध्दा पाणी मिळत नाही व माजीपराद्वारा होणारा पुरवठा नियमीत व पूर्ण दाबाने होत नाही, आजरोजी शहरातील काजी प्लॉट, लाहोटी प्लॉट, आनंद नगर, लक्ष्मी नगर, गौमतनगर, पंचशिल नगर, गवळीपुरा, इंगोले प्लॉट काँग्रेस नगर, भारतीपुरा, मातोश्री रमाबाई कॉलनी,गवळीपुरा शांतीनगर, गुरुमंदीर अशा अनेक वस्त्यांमध्ये तसेच शहारातील मध्यवस्तीतील मस्जीदपुरा याठिकाणी सुध्दा पाणीपुरवठा पुर्ण दाबाने होत नसल्याने पूर्ण पाणी उपलब्ध होत नाही आणि अनेक नागरीक हे पैशे खर्च करुन पाणी घेऊ शकत नाही. त्यामुळे नागरीकांमध्ये असंतोष व हाहा कार निमार्ण होऊन पाण्यासाठी भांडणे होतील व शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
या बाबींचा विचार करून शहरातील सर्व भागांमध्ये योग्य व पुर्ण दाबाने व दररोज नियमीत पाणी पुरवठा होईल यादृष्टीने आवश्यक ती तांत्रीक उपाय योजना करुन नियमीत पाणी पुरवठा करावा आणि नागरीकांना यासाठी जनआंदोलन करण्यासाठी भाग पडू नये व नागरीकांच्या आवश्यक पाण्याची समस्या करून नियमित पाणी पुरवठा सुरू ठेवण्याची मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली यावेळी जाकिर शेख,सै मुजाहिद,अ रशीद,अमीर पठाण,इरफान खान,जावेदोद्दीन,सदीम नवाज,शाफिक अहेमद,मुन्ना ठेकेदार, युसुफ ठेकेदार आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments