पोलीस स्टेशन मानोरा जि. वाशिम दिनांक 06/05/2022
मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सा. यांचे आदेशाने वाशिम जिल्ह्यात माहे 05/2022 | मध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे, विक्री करणारे यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करणेबाबत विशेष मोहीम | राबविणेबाबत आदेश झाले असता पोलीस स्टेशन मानोरा जि. वाशिम हद्दीत दिनांक 04/05/2022 |च्या रात्री ग्राम गिरोली येथील शेतातील मोकळ्या जागेत गिरोली येथील शेख सुफियान शेख आतिफ | हे स्वताःचा वाढदिवस तलवारीने केक कापुन साजरा करीत असल्याबाबत व्हीडीओ दिनांक 05/05/2022 रोजी व्हॉट्सअप वर व्हायरल झाल्यानंतर ताबडतोब सदर घटनेची माहीती मा. पोलीस | अधिक्षक श्री. बच्चन सिंह सा. यांना देण्यात आली, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. गोरख भामरे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जगदीश पांडे यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही पोनि. सुनिल जाधव | सोबत पोहेकॉ गणेश जाधव, नापोकॉ मयुरेश तिवारी, बालाजी महल्ले असे ग्राम गिरोली येथे जावून | तलवारीने केक कापणारा ईसम शेख सुफियान शेख आतिफ याचा शोध घेवून त्वरीत त्याला ताब्यात | घेवून त्याचेघरातुन केक कापतांना वापरलेली तलवार जप्त करण्यात आली व पोलीस स्टेशनला सदर आरोपीस आणुन त्याचेविरुद्ध अप नं. 245/2022 कलम 4,25 आर्म अक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
*********************
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

0 Comments