Ticker

6/recent/ticker-posts

शेतकरी सहकार पँनलचा दणदणीत विजय

मंगरूळपीर/ता प्र :- तालुक्यातील सावरगांव(कान्होबा) येथे नूकतेच दि ४ मे रोजी सेवा सहकारी सोसायटीची निवडणुक मा.राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली ज्यात शेतकरी सहकार पँनलचा सर्वच ऊमेदवारांचा दणदणीत विजय झाला,तर ऊमेदवार व मतदार यांचे माजी राज्यमंत्र्यांनी आभार मानले
या सेवा सहकारी सोसायटीचे निवडणुक रिंगणात एकुन शेतकरी सेवा सोसायटीच्या ऊमेदवारांनी सहभाग घेतला होता,तर प्रतीस्पर्धी यांनी सुद्धा या नीवडणुकीत आपले नशीब आजमावायचे ठरवत आपली उमेदवारी दाखल केली,निवडणुकीची प्रकीया ही निवडणुक निर्णय अधिकारी सचिन बकाले यांचे उपस्थितीत पार पडली तर शेतकरी पँनलच्या समोरील उमेदवार, आनंद नानाराव राऊत, दामोदर सिताराम चव्‍हाण, प्रकाश नागोराव चव्हाण, शामराव लाडू चव्हाण, कल्पना विजय चव्हाण, मीराबाई बाबुलाल राठोड, पांडुरंग दगडू कांबळे, प्रेमसिंग हरसिंग राठोड, विट्टल मेराम चव्हाण, कानू देवमन महहले, विनोद नारायण राठोड, मानप्यारि प्रकाश जाधव, काशीबाई प्रल्हाद राठोड या ऊमेदवारांना प्रत्येकी शंभर  सव्वाशे चे वर मतदान पडल्याने दणदणीत विजय खेचल्या गेला,या निवडणुकीत माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्याने विजय झाल्याचे सर्वच विजयी ऊमेदवारांनी संबोधले तर यावेळी सर्वच १३ सदस्यांचे अभिनंदन माजी राज्यमंत्री यांनी केले,या निवडणुकीत अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष डॉ. परशराम चव्हाण, तारासिंग मेराम जाधव, भीमराव कालूसिंग चव्हाण, भिमराव लोडू चव्हाण, सुरेश शेषराव राठोड, गोपीचंद अर्जुन चव्हाण, शेषराव चव्हण, सुभाष इंगोले, प्रदीप महल्ले यांनी अथक परिश्रम घेतले,

Post a Comment

0 Comments