मंगरूळपीर
जागतिक आरोग्य संघटना(WHQ) द्वारे घोषित असलेल्या युनो मधील 143 देशातील समावेशित 'भारत' हा देश आहे. या अनुषंगाने दि. 05 जून 2022 हा 'जागतिक पर्यावरण दिन', सामाजिक वनीकरण विभागातील 'वाशिम' अंतर्गत सामाजिक वनीकरण परिक्षेत्र मंगरूळपीर व कारंजा ते शेलू वाडा या महामार्गावरील तराळा येथे ग्रामस्थांचे उपस्थित भवानी माता मंदिर परिसरात वृक्षारोपण व ग्रामस्थांचे सहकार्यातून जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व विशद करण्यात आले. यावेळी तराळा गावातील, सरपंच सौ. प्रियंका विवेक महल्ले.उपसरपंच सौ.शिला दिलीपराव भगत. ग्रामपंचायत सदस्य गणेश भैसने, अनंता नेर, सामाजिक कार्यकर्ते श्री किशोरभाऊ देशमुख, गणेश आगळे, गणेश सावके, बंडू जाधव, गोपाल खोटरे, सुभाष आंबेकर, गजानन जाधव ग्रा. रोजगार सेवक विलास भैसकार, प्रकाश कांबळे, सामाजिक वनीकरण परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी, बी. एम. मेश्राम, वनपाल राठोड, वनपाल अकोला, वनरक्षक भालेराव, वनकर्मचारी नेमाने व इतर वनमजूर, गावातील नागरिक उपस्थित होते.

0 Comments