अशी आहे मुंबईतील स्थिती
बाधित रुग्ण : ९६१
लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांची संख्या - ९१७ (९५ टक्के) रुग्णालयात दाखल केलेले रुग्ण- ४४
लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांची संख्या - ९१७ (९५ टक्के) रुग्णालयात दाखल केलेले रुग्ण- ४४
ऑक्सिजनखाटांवरील रुग्णांची संख्या - ४ रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या रुग्णांची संख्या १८१
करोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या - ३७४ मृत रुग्णांची संख्या - १
एकूण चाचण्या - ८७७८ मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर - ९८ टक्के
२९ मे ते ४ जूनपर्यंत मुंबईतील एकूण करोना रुग्णवाढीचा दर - ०.०५७ टक्के
मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर - १२०४ दिवस
अतिजोखमीतील रुग्णांचा शोध -६३२७
अतिजोखमीतील रुग्णांचा शोध -६३२७
चौथ्या लाटेची सुरुवात?
करोना रुग्णांची संख्या प्रतिदिवस एक हजार रुग्णापेक्षा अधिक नोंदवली गेली तर ती चौथ्या लाटेचा सुरुवात असू शकते, याकडे संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. आर. एस. मारूल यांनी लक्ष वेधले आहे. हा संसर्ग कोणत्या कारणांमुळे वाढत आहे, याचा अभ्यास करण्यात येत आहे.

राज्यातही मोठी वाढ
राज्यातही करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून रविवारी दिवसभरात एकूण १ हजार ४९४ रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. तर दिवसभरात एका करोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचे आरोग्य विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत ६१४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबई पाठोपाठ ठाण्यात १०८, रायगड २६ तर पुण्यात ६३ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये १८ तर वसई-विरारमध्ये रविवारी ४५ रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे.
0 Comments