डिक्शनरीत काय म्हटलंय?
दोन पक्ष जेव्हा दोघांच्या फायद्यासाठी अनौपचारिक चर्चेत एखादा करार करतात, त्याला घोडेबाजार म्हटलं जातं, असं केंब्रिज डिक्शनरीत नमूद केलं आहे.
एक किस्सा असाही…
प्राचीन काळात भारता व्यापारी आपल्या सेवेकऱ्यांना अरब देशांमध्ये घोडे खरेदी करण्यासाठी पाठवत असत. मात्र, परत येईपर्यंत काही घोड्यांचा मृत्यू होत असे. मात्र, आपल्या मालकांना खूश करण्यासाठी घोड्यांची शेपटी दाखवूनच गिनती करत असतं. म्हणजे 100 घोडे खरेदी केल्यानंतर 90 घोडेच दाखवले जात असत. 10 घोड्यांची शेपटी दाखवून ते मेल्याचं मालकाला सांगितलं जात असे. त्यावर मालकांचाही विश्वास बसत असे. त्यानंतर हे सेवक 100 घोड्यांचे पैसे घ्यायचे आणि केवळ 90 घोड्यांचीच खरेदी करायचे. म्हणजे दहा घोड्यांचे पैसे स्वत:च्या खिशात घालत असत. यालाही हॉर्स ट्रेडिंगच संबोधलं जाऊ लागलं.
राजकारणातील घोडेबाजार कसा चालतो? खरेतर राजकारणात घोडेबाजार या शब्दाचा काहीच अर्थ नाही. मात्र, राजकीय समीकरणं बदलू लागले, आघाड्यांचे सरकार येऊ लागल्याने तिथेही अपक्ष किंवा छोट्या पक्षांच्या आमदार आणि खासदारांची डिमांड वाढली. त्यामुळे अमिषे दाखवून या आमदार आणि खासदारांना आपल्याकडे ओढल्या जाऊ लागले. त्यामुळे या व्यवहारालाही हॉर्स ट्रेडिंग असं नाव देण्यात आलं. भारतात यालाच दलबदलू किंवा आयाराम गयारामही म्हटलं जातं. याबाबत देशात कायदाही आहे.
घोडेबाजाराचे प्रकार काय?
घोडेबाजार अनेक प्रकारचा असतो. पैशाची लालच दाखवणे. पद, प्रतिष्ठा, किंवा एखादं आश्वासन हा प्रकार सुद्धा घोडेबाजारात येतो. अशावेळी धूर्त सौदेबाजी केली जाते. मात्र, शेवटी एखाद्या पॉइंटवर दोन्ही पक्ष मान्य होतात.
राजकारणात काय होतं?
एखाद्या पक्षाला सरकार बनवताना आमदार किंवा खासदार कमी पडतात तेव्हा अपक्ष किंवा इतर छोट्या पक्षांच्या आमदार आणि खासदारांचं अचानक राजकीय महत्त्व वाढतं. अशावेळी या आमदार, खासदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी अनेक प्रलोभने आणि आश्वासने दिली जातात. अशावेळी आर्थिक व्यवहारही होतात. अशावेळी साम, दाम आणि दंडाचाही वापर केला जातो.
1967 मध्ये भारतातील राजकारणात या शब्दाचा प्रयोग केला गेला. 1967 मध्ये हरियाणाचे आमदार गया लाल यांनी अवघ्या 15 दिवसात तीन वेळा पक्ष बदलला होता. अखेरीस तिसऱ्यावेळी ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. त्यावेळी काँग्रेस नेते विरेंद्र सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन मजेदार विधान केलं होतं. गयाराम आता आयाराम बनले आहेत, असं विधान त्यांनी केलं होतं.
जगात अनेक ठिकाणी पक्षांतर विरोधी कायदा
केवळ भारतातच नाही तर जगात अनेक ठिकाणी पक्षांतर विरोधी कायदा लागू करण्यात आला आहे. बांगला देश, दक्षिण आफ्रिका आणि केनिया आदी विकसनशील देशात हा कायदा आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कॅनडा, फ्रान्स, जर्मनी आणि युके आदी विकसित देशात अशा प्रकारचा एकही कायदा नाही.
0 Comments