Ticker

6/recent/ticker-posts

राज्यपालांच्या आदेशांविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात



 : राज्यात सुरू असलेल्या उलथापालथीमध्ये आता वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत. एकीकडे भाजपानं पहिल्यांदाच या सगळ्या वादामध्ये उडी घेत थेट राज्यपालांची भेट घेत राज्य सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची विनंती केली. त्यापाठोपाठ राज्यपालांनी ३० जूनला विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन पाचारण केलं आहे. मात्र, राज्य सरकार या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची भूमिका मांडण्यात आली आहे.


राज्य मंत्रिमंडळाची संध्याकाळी ५ वाजता बैठक. बहुमत चाचणीवर चर्चा होण्याची शक्यता. दुसरीकडे संध्याकाळी ५ वाजताच सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. तर त्याचवेळी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी बहुमत चाचणीत मतदान करण्याची परवानगी मागण्यासाठी दाखल केलेल्या याचिकांवर देखील सुनावणी होणार आहे.

Post a Comment

0 Comments