Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा , महिलांचा विशेष प्रतिसाद

शरीर निरोगी आणि मन शांत ठेवण्यासाठी जगभरातील बहुतेक लोक योगाचा अवलंब करतात. जगभरात योगाबद्दल जनजागृती करण्यासाठी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. आज मंगळवारी जगभरात आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. या दिवशी जगातील अनेक देशांतील लोक एकत्र येतात आणि योग दिवस साजरा करतात. मंगरूळपीर येथील महात्मा ज्योतिबा फुले उद्यान विकास वृक्षसंगोपन योगप्रसार समिती,
स्वामी रामदेवजी महाराज योग गुरु, महात्मा बसवेश्वर संस्था, कोठारी
तर्फे योग दिन निमीत्त येणाऱ्या सगळ्या मान्यवर पाहुण्यांचे व योग साधकांचे मनापासून स्वागत .योग शिक्षक राम व्यवहारे हे गेल्या अनेक वर्षांपासून योगाचे धडे देत आहे. वाशीम जिल्ह्या सारख्या ठिकाणी अनेक नागरिक योगाचे धडे गिरवत आहेत.
योगाचे महत्त्व विशद करून विविध योगासने शिकवून उपस्थितांकडून करून घेतली. 
             योगादरम्यान मानेचे व्यायाम,वृक्षासन,पादहस्तासन,
अर्धचक्रासन,त्रिगुणासन,जेवणानंतर त्वरित करता येणारे व जेवण पचविण्यास मदत करणारे वज्रासन, श्वसन तंत्र सुधारण्यासाठी दंडासन, भद्रासन, पचनसंस्था सुधारण्यासाठी अर्धंउष्ट्रासन,शशांकासन,मण्डुकासन, दंडासन,वक्रासन,भुजंगासन, शलभासन,सेतुबंधासन,उत्तपादासन, कपालभारती,अनुलोम-विलोम प्राणायाम,शीतली प्राणायाम,भ्रामरी प्राणायाम,अर्धहलासन,पवनमुक्तासन आणि परिश्रमानंतर करावयाचे आसन म्हणजे शवासन आदी आसने व योगासने योग प्रशिक्षक राम व्यवहारे उपस्थितांकडून करून घेतली.
              योग दिनाच्या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता राम व्यवहारे ,एडवोकेट घनश्यामदाजी राठी ,बाळासाहेब हवा , सचिन बंग, नैनिष उत्तरवार, राजेश राऊत ,जगन्नाथ उगले, गणेश राठोड, श्याम खोडे, रवी पाटील ठाकरे, अभिषेक दंडे ,महादेव विश्वकर्मा, गोपाल वर्मा, महेश अहिरकर,  गणेश राठोड ,जगन्नाथ उगले, राजूरकर पजई, सुनिल श्रुंगारे, हर्षद कोकरे इत्यादीं सोबत महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती यामध्ये विशेष म्हणजे या उद्यानासाठी कोणताही स्वार्थ न बाळगता कार्य करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले उद्यान विकास वृक्षसंगोपन प्रणेत्या
संगीता हवा, कविता व्यवहारे ,तृप्ती बंग ,संध्या व्यवहारे, साधना गावंडे, अनुष्का धोत्रे ,राधिका ठाकरे ,सुनिता भोजने , अश्विनीताई अवताडे, राऊत, लहान मुला मुली सह
आदींनी परिश्रम घेतले 



मंगरूळपीर येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले उद्यानात जागतिक योग दिनाला योग साधकांचा प्रतिसाद

कार्यक्रमाचे संचालन आभार प्रदर्शन अशोक राऊत यांनी केले





Post a Comment

0 Comments