Ticker

6/recent/ticker-posts

सांगली जिल्ह्यात विधवा महिला स्मशानातील करण्यात येणारी रुढी थांबवण्यात आली.

सांगली जिल्हाध्यक्ष  मिनल कुडाळकर यांनी दखल घेवुन त्यानी
आज एका गावात विधवा प्रथा  करण्यात येत असताना, यशस्वी प्रयोग झाला.स्मशानातील करण्यात येणारी रुढी थांबवण्यात आली.विशेष म्हणजे या प्रथा बंद करू असं महिला वर्ग तसेच पुरुष वर्गांनी मान्यता दिली . नक्कीच आज  समाधान वाटले .समाज सुधारतोय फक्त प्रत्यक्ष उतरून काम करण्याची गरज . सामाजिक कार्यकर्ते , पदाधिकारी,नेते मंडळींनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. ज्या महामानवांच्या विचारधारे विचारांनी आपण  प्रभावित होऊन आज आपण सन्मानाने जगत आहोत,  महामानव रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर महिलांसाठी शिक्षणाचे दार उघडे करून देणारे महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपति शाहू महाराज, जिजामाता ,सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होलकर इत्यादी सर्व महामानव, व महामातांना त्रिवार अभिवादन तसेच 
महाराष्ट्र महिला विकास मंच च्या . विधवा महिला समान कायदा अभियान राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या समन्वयक कालिंदिलाई पाटील यांनी कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता हिरीरीने अभियानात सहभाग घेतला आणि अभियानाला सुरुवात केली या अभियानाच्या महायज्ञात बऱ्याच ग्रामपंचायतीने विधवा महिला समान कायदा राबवण्यासाठी ठराव घेण्यातआले.कालिंदि ताई पाटील यांचे संपूर्ण महाराष्ट्र आणि विदर्भ स्वागत करत आहे. विदर्भातील आणि महाराष्ट्रातील संपूर्ण ग्रामपंचायत मधून विधवा महिला सन्मान कायद्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा. सांगली जिल्ह्याने प्रथम बहुमान मिळवला आहे आपल्या जिवाची पर्वा न करता निर्भीडपणे या रुढी परंपरेला विरोध करण्यात आला पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या रूढी ला सासु सुना ने केले धाडसाचे काम
महाराष्ट्र महिला विकास मंच च्या
सांगली जिल्हाध्यक्ष  मिनलताई  कुडाळकर , ऑ . अवीनाश कुडाळकर, समृद्धीताई कुडाळकर, प्रवीण पिसे इत्यादी कार्यकर्त्यांनी नागरिकांचे परिवर्तन केले. यांच्या कार्याचे कौतुक विदर्भ आणि महाराष्ट्रात होत आहे.
आंतरराष्ट्रीय दिवस  हे जनतेला चिंतेच्या मुद्द्यांवर शिक्षित करण्यासाठी, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि संसाधने एकत्रित करण्यासाठी विधवांच्या आवाजाकडे आणि अनुभवांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांना आवश्यक असलेल्या अनन्य समर्थनासह प्रेरित करण्यासाठी.
 आता पूर्वीपेक्षा अधिक, हा दिवस विधवांना पूर्ण हक्क आणि मान्यता मिळवून देण्यासाठी काम करण्याची संधी आहे असे मत मिनलताई  कुडाळकर यांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments