राज्यात एकाएकी झपाट्याने रुग्णसंख्येत वाढ झाल्याने एकूणच भितीचं वातावरण आहे. आतापर्यंत कोरोनामध्ये आपल्या सर्वांनाच मनाविरुद्ध या सर्व निर्बंधांचं पालण करावं लागलं. मात्र पुन्हा तशा परिस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासन सतर्क झाली आहे.
सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दररोज वाढणारी कोरोना रुग्णसंख्या आणि नियमावली यावर चर्चा होणार असल्याचं समजतंय. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय घेतला जातोय, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे.
...तर मास्कसक्ती अटळ
मुंबईत कोरोना रुग्ण वाढल्यास मास्कसक्ती अटळ असल्याचे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत. कोरोना नियम न पाळल्यास कठोर निर्बंध लागतील, असाही इशारा अस्लम शेख यांनी दिलाय. तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मास्क घालण्याचं आवाहन केलंय.
0 Comments