महाराष्ट्रात होणाऱ्या पोलीस पाटील पद भरती प्रक्रियेत विधवा व परित्यक्ता महीलाना प्राधान्य द्यावे अशी मागणी महीला विकास मंचच्या कालिंदी पाटील यांनी शासनाकडे निवेदनातून केली आहे. पोलीस पाटीलांच्या नियुक्त्या विषयांकीत प्रकरणी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम, १९६७ व महाराष्ट्र ग्राम पोलीस (सेवा प्रवेश, वेतन भत्ते आणि सेवेच्या इतर शर्तों) आदेश १९६८ नुसार पोलीस पाटीलांच्या नेमणूका, आरक्षण, अपिल प्रकरणी सहायक आयुक्त, मागास वर्ग कक्ष, कोकण विभाग यांचेकडून पोलीस पाटील सरळसेवा या संवर्गाची बिंदूनामावली तपासून घेण्याची कार्यवाही तात्काळ करुन घेणेबाबत
शासनाकडे या कार्यालयाकडील संदर्भिय पत्र क्र.१ अन्वये कळविण्यात आले आहे तसेच सहाय्यक आयुक्त, मागास वर्ग कक्ष, कोकण विभाग, कोकण भवन यांनी दि. २१/०४/२०२२ ते दि. २६/०५/२०२२ या कालावधीकरीता सरळसेवा संवर्गातील बिंदूनामावली नोंदवही तपासणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
रायगड जिह्यातील पोलीस पाटील या पदासाठी एकुण १९८८ जागा मंजूर असून त्यापैकी ९१० पदे दि. ३१/१२/२०२१ अखेर पर्यंत रिक्त आहेत. कोविड- १९ विषाणूच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात कार्यरत पोलीस पाटीलांवर अतिरिक्त ताण येत आहे व कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर पोलीस पाटलांची प्रत्येक गावामध्ये लसीकरण तसेच इतर कामामध्ये उणीव भासत आहे. यास्तव रायगड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय स्तरावर रिक्त पोलीस पाटील संवर्गातील एकुण ९९० रिक्त पदे भरणेच्या अनुषंगाने संपूर्ण रायगड जिल्ह्यात एकाच वेळेस भरती प्रक्रिया राबविण्याबाबतचा कालबध्द कार्यक्रम तयार करणेत आलेला आहे. तरी या पदभरतीत पारदर्शकता ठेवून विधवा महिलांच्या भवितव्याचा विचार करून त्यांना सदर भरती मधे
अग्रीम प्राधान्य द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे


0 Comments