Ticker

6/recent/ticker-posts

नाथ-पीरांच्या महाराष्ट्रातील आगळी वेगळी पालखी.....


:- अरूण कुमार इंगळे मंगरूळपीर

आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या पालखी यात रोजच काही पालख्या मंगरूळपीर वरून पंढरपुर मार्गाने चाललेल्या आहेत आज मी अकोला चौकातून गावात येत असताना मला परम संत श्री मोहम्मद खान महाराज यांची पालखी दिसली पंढरपूरला जाणार आहेत अशा पालक या या वारकरी संप्रदायात पण हा वारकरी संप्रदाय आणि मुस्लिम संत याचा समीकरण काही माझ्या डोक्यात जुळलं नव्हतं म्हणून मी मुद्दामून या पालखीचा मुक्काम असलेल्या श्री बिरबलनाथ महाराजांच्या मंदिरात आलो आणि या पालखी चे प्रमुख अनिल देशमुख राहणार गणोरी जिल्हा अमरावती यांची मुलाखत घेतली त्याठिकाणी मोहम्मद खान महाराजांच्या पालखी च्या भोवती एक रिंगण आणि हरिपाठाचा कार्यक्रम पार पडला या महाराष्ट्राला वारकरी संप्रदाय काही नवीन नाही मग मी या मोहम्मद खान महाराजांचा वारकरी संप्रदाय अशी काय संबंध आहे या संदर्भात श्री देशमुख यांची चर्चा केली असता त्यांनी या पालखीचा संबंध हा अंजनगाव सुर्जी येथील जितेंद्रनाथ महाराजांच्या संस्थांनशी येत असून मोहम्मद खान महाराज आपल्या हाती दरवर्षी पंढरपूरला वारी घेऊन जात असल्याचे समजले त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या संस्थानातून ही पालखी आता दरवर्षी पंढरपूरला जाते हे त्यांचं 16 वर्ष आहे मात्र यात नवल विशेष असं की मुस्लिम जनता ची पालखी आणि हिंदू समाजाचे लोक घेऊन जातात हे खरोखरच राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मला वाटलं वास्तविक पाहता वारकरी संप्रदाय हा संत तुकोबा च्या काळापासून म्हणजे आज जवळपास शाळे तीनशे वर्षांपूर्वीचा चालत आलेला असावा केव्हापासून या संतांचे अस्तित्व या गावात असून मोहम्मद खान महाराज हे या परिसरातील पंचक्रोशीत असलेल्या गावाचं ग्रामदैवत म्हणून शांती प्राप्त आहे आणि आणि या पालखीचे आज मी एकंदरीत 52 स्त्रिया आणि 140 पुरुष व दहा पाच कर्मचारी पाणीपुरवठ्याची गाडी अन्नपुरवठा ची गाडी सोबत सर्व औषधे वगैरे रसद तयार आहे आजच्या काळात गावाच्या नावासाठी भांडणे होताना आपण पाहतो त्याचबरोबर देवाच्या नाव एकमेकांच्या जीवावर उठणारे हॅलो पाहतो आणि अशा स्थितीत सामाजिक व राष्ट्रीय एकोपा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून मोहम्मद खान महाराजांची पालखी घेऊन जाणारा हिंदू समाज यापेक्षा आणखी कोणता राष्ट्रीय एकात्मतेचे उदाहरण असावा असं मला वाटलं या पालखीचं माझे मित्र श्री आत्माराम पाटील वरुड मनमोहन शर्मा देशमुख सर रामदास गायकवाड लोकांनी स्वागत केलं आणि या पालखीच्या सोबत असलेल्या भाविकांच्या जेवणाची व्यवस्था संत श्री बिरबलनाथ महाराजांचे मंदिरात केली आणि हिंदू-मुस्लीम ऐक्याचे उदाहरण सतत चालू राहावं म्हणून त्यांच्या कार्यक्रमात सामील होऊन त्या मंडळींना प्रोत्साहन दिलं या सर्व सहकार्यासाठी ह भ प श्री अनिल देशमुख महाराज गणोरी यांनी आभार देखील मानले या पालखी ने गायलेला हरिपाठ विठ्ठलाची आरती त्याचे चित्रीकरण करून मी सामाजिक ऐक्याचं प्रतीक आहे . 

Post a Comment

0 Comments