वाशिम जिल्ह्यात अवैधरित्या दारू विक्री पर पायबंद घालण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. सदर मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह यांनी जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच ठाणेदार यांना सुचना देवून जास्तीत जास्त कारवाया करण्याचे आदेश दिले आहे.
त्याअनुशंगाने पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे १२ केसेस, वाशिम ग्रामीण १६ केसेस, रिसोड १८ केसेस शिरपुर केसेस १५. मालेगाव ९ केसेस, मंगरुळपीर २४ केसेस, अनसिंग ११ केसेस आसेगाव १३ केसेस, जवळका १४ कैसेस कारंजा शहर १३ केसेस, कारंजा ग्रामीण ३३ केसेस मानोरा १६ केसेस,
धनज १३ केसेस करून असा एकूण १३ पोलीस स्टेशन अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी कायदयान्वये २०७ गुन्हे दाखल केले असून एकण २१० आरोपीवर गुन्हे नोंदविण्यात आले. आरोपीकडून एकूण ५८३२६५/- रु. किमतीची देशी विदेशी तसेच गावठी हातभटटीची दारू जप्त करण्यात आली
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक गोरख भामरे उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम, मंगरुळपीर आणि कारजा, पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा वाशिम, तसेच जिल्हयातील सर्व ठाणेदार यांनी आपला सहभाग नोंदविला आहे.
मा. पोलीस अधीक्षक वाशिम श्री बच्चन सिंह यानी सर्वजनतेस सुजाण नागरिक म्हणून अशा प्रकारची
काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती दयावी माहिती देणाऱ्या इसमाचे नाव गोपनिय यात येईल असे
आवाहन केले आहे.
0 Comments