Ticker

6/recent/ticker-posts

श्री संत वासुदेव महाराज यांच्या पालखीचा जवळा बाजार ,हट्टा येथे जंगी स्वागत.

              अकोला..,....,............,....,.... श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अकोट जिल्हा अकोला.. गुरुवर्य वासुदेव महाराज श्रद्धा सागर आकोट येथून निघालेला पैदलरवारी पालखीचा प्रवास  औंढा वरून हट्टा पर्यंत पूर्ण झाला असून  अनेक ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले  असून आज संध्याकाळी    पावसाने हजेरी लावून वारकऱ्यांचे स्वागत केले महादेवाचे मंदिरत धर्म शाळेमध्ये मुक्कामाच्या ठिकाणी हरिपाठ कीर्तनाचा कार्यक्रम याठिकाणी संपन्न झाला
 त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम पार पडला व त्या कार्यक्रमाचे आयोजन  शंकर आप्पा उजवनकर यांनी केले होते. सकाळी चहापान आटपून पालखी  हट्टा वरून परभणीकडे रवाना झाली .     शहरात अनेक गावांमध्ये व शहरातील अनेक ठिकाणी पालखीचे भव्यदिव्य स्वागत केले. तसेच वरुणराजाने हजेरी लावली माउलीच्या पालखीचे सुद्धा स्वागत केले . दुपारचे जेवण व प्रवचन   जवळा बाजार येथील अशोकराव शेळके व गावातील नागरिकांनी भव्यदिव्य स्वागत केले तसेच दुपारचे जेवण सुद्धा दिले  या ठिकाणी प्रवचन झाल्यावर दिंडी पुढील मार्ग  कडे प्रस्थान केले . पालखीचे सकाळी    हट्टा वरून परभणी  कडे प्रस्थान झाले. जय हरी माऊली, जय जय राम कृष्ण हरी , वासुदेव महाराज की जय ,भास्कर महाराज की जय असे नारे लावत पालखी   अनेक गावकऱ्यांचे स्वागत मधेच चहापान फराळ तसेच  अनेक अभंगाचा गजर करत आली त्यानंतर अनेक गावात  गावकऱ्यांच्या वतीने भव्यदिव्य स्वागत करण्यात आले तसेच वारीमध्ये सहभागी भक्तांनी या ठिकाणी पावली, फुगडी ,रिंगण भारुड आधी करुन गावकऱ्यांचे मन जिंकली त्यानंतर पालखी सकाळी सहा वाजता  हट्टा संस्थान वरून परभणी कडे पुढील प्रवासाला प्रस्थान केले अशी माहिती वारीमध्ये सहभागी असलेले वारकरी समाजसेवक गजानन हरणे यांनी दिली   

Post a Comment

0 Comments