वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यात अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या
रजनीताई नानासाहेब धानोरकर (बाई)
स्काऊट व गाईडचा सिल्वर स्टार
राष्ट्रपती पुरस्कार ,महाराष्ट्र शासनाने आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कृत केलेल्या तसेच अमरावती विभागातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार
प्राप्त व साक्षरता अभियानामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तथा धानोरा गावच्या माजी सरपंच, संस्थेच्या कोषाध्यक्ष माजी प्राचार्य श्रीमती रजनीताई नानासाहेब धानोरकर यांच्या कार्याचा महाराष्ट्र शासन व विदर्भ वैधानिक विकास महामंडळाने गौरव करत त्यांना सन्मानित केले आज दिनांक 17 जुलै 2022 रोजी त्यांचा 75 वा वाढदिवस अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने व दिमाखाने साजरा करण्यात आला
आदर्श शिक्षिका - मुख्याध्यापिका,
महाराष्ट्र राज्य सावित्री बाई फुले पुरस्कार प्राप्त,राज्य स्काऊट गाईड संघाच्या आजीवन सदस्या, उच्च विद्याविभूषित, आदर्श सरपंच, समाज कारणी, धानोरकर परिवार आणि धानोरा गावाचा आधारस्तंभ, प्रत्येकाच्या सुखादुःखात सदैव हजर असणाऱ्या, जेवढ्या पुरोगामी तेवढ्याच धार्मिक, उत्कृष्ट मार्गदर्शक, एक नृत्य दिग्दर्शिका, सूक्ष्म नियोजन कर्त्या,आदर्श व्यवस्थापक, आदर्श गृहिणी, जिजाऊ व सावित्रीबाई विचारवादी अशा अस्तपैलू व्यक्तिमत्त्वाच्या धनी , सत्यवादी वरवर जरी कणखर पण अगदी मायाळू हृदयाच्या पंचकोशीतील जनसामान्यांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व डोळे बंद केले की डोळ्यासमोर श्रीमती रजनीताई नानासाहेब धानोरकर (बाई) आणि आमच्या मामी. यांचे प्रतिबिंब उभे राहते राजकारणापेक्षा शिक्षण आणि सामाजिक कार्यात उभा आयुष्यभर कार्य केले कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी नावाचा गवगवा न करता अविरत कार्य चालू आहे बाईंना दोन मुले व एक मुलगी आहे मोठा मुलगा डॉक्टर माणिकप्रभू धानोरकर, लहान मुलगा मंगेश धानोरकर , स्वातीताई , आज रजनी बाईंचा 75 वा वाढदिवस अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंचकोशीतील व विदर्भातून महाराष्ट्रातील नेते मंडळींच्या विद्यार्थ्यांच्या व नातेवाईकांच्या भरभरून शुभेच्छा
रजनी बाईंचे राहिलेले कार्य सांभाळणारी अंजलीताई धानोरकर, असो की. त्यांच्या शिक्षण संस्थेतील कर्मचारी असो. बाईंचा आदर्श घेऊन अविरत कार्य सुरू आहे.
17 जुलै 1947 रोजी स्वर्गीय बाबासाहेब विघे व अन्नकलीताबाई विघे यांच्या पोटी जन्म घेतला वडील तहसीलदार असल्याने विविध ठिकाणी त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले पहिली ते चौथी चांदुर रेल्वे ,पाचवी ते सहावी गव्हर्नमेंट हायस्कूल दर्यापूर ,सातवी ते आठवी चांदुर रेल्वे , नववी पांढरकवडा, दहावी वणी यवतमाळ तर प्री फायनल पर्यंतचे शिक्षण काटोल नागपूर येथे झाले. जून 1969 मध्ये स्व नानासाहेब सुदामराव धानोरकर यांच्यासोबत त्या विवाहबद्ध झाल्या व 1 जुलै 1969 पासून शिक्षण विभागामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत झाल्या. बालपण अतिशय ऐश्वर्यात घालवलेल्या या महान स्त्रीने लग्नानंतर एका छोट्याशा धानोरा खुर्द या गावांमध्ये शिक्षणाची गंगा आणली, मागासवर्गीय वस्तीगृहातील मुलांना स्वतःच्या हाताने भाकरी करून खाऊ घातले. गावामध्ये लाईन नाही, जात्यावर दळण दळले, विहिरीतून पाणी आणले, शेतामध्ये राबराब राबल्या व अनेक मुलांना घडवले. अनेक असे जीवघेणी संकटे त्यांच्यासमोर या 75 वर्षांच्या काळामध्ये उभे राहीले. परंतु त्याला न घाबरता न जुमानता धैर्याने व शांत चित्ताने त्यांनी यशस्वी 75 वर्ष समाजाला प्रेरणा दायक राहतील अशी उभी केली आणि म्हणून त्यांना शुभेच्छा देण्याकरता परिसरातील त्यांचे विद्यार्थी ,माजी विद्यार्थी, पालक ,आप्तेष्ट सगेसोयरे ,जावई मुली सर्व मोठ्या हिरीरीनं शुभेच्छा देण्याकरता श्री धानोरकर आदर्श विद्यालय धानोरा खुर्द येथे एकत्रित झाले व मोठ्या उत्साहाने अमृत महोत्सव साजरा केला.
या समारंभाला संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर तात्यासाहेब धानोरकर स्काऊट गाईड राज्य संस्थेचे विविध पदाधिकारी अमरावती येथील इथापे मॅडम, धोटे मॅडम, चांदूरकर सर, व्ही एस काळे सर अकोला, आर एन गावंडे सर मूर्तिजापूर, एस आर पुंड सर कारंजा, विविध पक्षांचे नेते त्यामध्ये काँग्रेसचे दिलीप मोहनवाले शिवसेनेचे अनिल राऊत , दिलीप जाधव बीजेपी चे पदाधिकारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी मराठी विदर्भ मार्केटिंग फेडरेशन चे माजी संचालक वसंतराव पाटील शेगीकर, अमरावती महानगरपालिकेचे शिवसेना गटनेते प्राध्यापक प्रशांत भाऊ वानखडे ,श्री काळमेघसर मंगरूळपीर , मराठा सेवा संघाचे प्रकाश धोटे आदींनी शुभेच्छा दिल्या, यावेळी गावातील महिला भगिनी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. मंगेशजी धानोरकर यांच्या मातोश्री जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां राष्ट्रपती पुरस्कार सम्मानित रजनीताई धानोरकर यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या वतीने मानाचा मुजरा
0 Comments