अकोला .....,.............................. अकोला ते बार्शीटाकळी रोडवर नवीन बायपास फुलाच्या खाली पावसाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी थांबत होते. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता व अपघात सुद्धा होत होते याची दखल घेऊन माजी नगरसेविका सौ. शारदा वैकुंठ ढोरे यांनी या गंभीर प्रकरणाचा व त्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यास त्रास होत असलेल्या. या
सदर समस्येवर मार्ग काढण्याकरिता अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्या माध्यमातून त्यांच्याकडे या प्रकरणाची माहिती देऊन हे लोकांना त्रास होणारे प्रकरण सोडवण्यासाठी गांभीर्याने पाठपुरावा करून घेऊन अधिकारी व कंत्राटदारांच्या मागे लागून तात्काळ काम करून घेतले व समस्या मार्गी लावली. त्याबद्दल आमदार रणधीर सावरकर व माजी नगरसेविका सौ शारदा वैकुंठ ढोरे यांचे खडकी नागरिकांच्या वतीने व निर्भय बनो जनआंदोलन अकोल्याच्या वतीने दोघांचेही जाहीर आभार मानून त्यांना धन्यवाद दिले आहे .
0 Comments