Ticker

6/recent/ticker-posts

माणूस घडविणारे ज्ञान शिक्षण म्हणजे मूल्य शिक्षण रजनीताई धानोरकर

            




       श्रीमती रजनीताई
आपणास शिवनेरीची श्रीमंती 
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता 
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो
या श्रीमंतीवर आपण न थांबता शिक्षणाची गंगा गंगा तुमच्या माध्यमातून गोरगरिबांच्या घराघरात पोहोचवली त्याबद्दल प्रार्थना 
गंगा आपण घराघरात पोहोचवली आपणास त्याबद्दल आई भवानीच्या चरणी प्रार्थना करतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा




आई भवानी मातेच्या कृपेने आणि सकळजनांच्या सदिच्छांमुळे धानोरकर  कुटुंबियांच्या जीवनात  आई साहेबांचा श्रीमती रजनीताई नानासाहेब धानोरकर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त,
महाराष्ट्र राज्याचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त व श्री धानोरकर आदर्श महाविद्यालय धानोरा खुर्द संस्थेच्या कोषाध्यक्षा,
म. रा. भारत स्काऊट गाईड संस्थेच्या आजिवन सभासद असलेल्या 
रजनीताई यांच्या कर्तव्यनिष्ठ
आणि यशस्वी आयुष्याचा ७५ वा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने  कॅप्टन असो किंवा नानासाहेब यांनी आपल्या जीवनात शिक्षण रुपी लावलेल्या वटवृक्षाची जोपासना केली त्याचप्रमाणे रजनीताईने खंबीरपणे उभे राहून कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता गोरगरिबांच्या मुला मुलींना शिस्तबद्ध शिक्षण दिले. त्यांनी शिकवलेल्या शिक्षणाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उंच शिखरावर पोहोचले त्यापैकी एक मी सुद्धा आहे. ताट मानाने स्वाभिमानाने मी माझ्या फिल्ड मध्ये जीवन जगत आहे. मॅडम विषयी लिहिले तेवढे शब्द थोडे आहे. सूर्याचा धर्मप्रकाश देणे, वायूचा धर्म प्राण देणे, पाण्याचा धर्म तहान भागवणे, चंद्राचा धर्म शितलता प्रधान करणे अशाच प्रकारे धर्माचा अर्थ कर्तव्य किंवा कर्तव्याचे पालन करणे होय.
जन्मतः सगळी माणसे सारखीच असतात, पण संस्कारांनी ती वेगवेगळ्या प्रकारे वागू लागतात. हे संस्कार जसे घराचे, परिवाराचे व परिसराचे असतात, तसेच ते शिक्षणाचे व साहित्याचे ही असतात.
कितीतरी थोर पुरूष त्यांना लहानपणी ज्या गुरुजींनी शिकविले त्यांचे व त्यांनी स्वतः वाचलेल्या सद्ग्रंथाचे ऋण मान्य करतात. आपण परमेश्वराची यथासांग पूजा करतो. तो आपल्याला चक्क पावतो सुध्दा, पण तो पूजेमुळे नव्हे, तर मनातल्या भावामुळे ! फळ हे श्रध्देच असतं ! पूजेचं नाही. जीवनामध्ये जर मोठे व्हायचे असेल तर, मोठ्यांचा आदर करणे, मानसन्मान राखणे, सर्वांशी प्रामाणिक वागणे, महत्वाकांक्षी असणे, आवश्यक आहे. आत्मविश्वास तर व्यक्तीला सर्व प्रकारच्या संकटावर मात करण्याचे सामर्थ्य देतो. ह्या सर्व गोष्टी आपण संस्काराशिवाय शिकू शकत नाही.शिक्षक बंधु / भगीनींनो माणूस बनविण्याची किमया शाळेच्या कोणत्या पुस्तकी विषयात नाही, ती आहे फक्त माणसात, म्हणजेच शिक्षकात. आपल्याला जिवंत माणसं घडवायची आहे कच्या मातीचे घडे नव्हे, लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा. त्याला जसा आकार दिला तसा तो घडतो. यालाच संस्कार म्हणतात. हे डोळस श्रध्दारूपी संस्काराचे बीज बाल मनावर बिंबवुन त्यांच्यामधे राष्ट्राभिमान जागृत व्हावा, सर्वधर्म समभावाची शिकवण मिळावी व राष्ट्रीय एकात्मता जोपासली जावी या उद्देशाने रजनीताईंची गेली 50 वर्षापासून धडपड सुरू आहे.
भारतीय संस्कृतीत विद्यादानाला सर्वश्रेष्ठ दान मानलं गेलयं. 'विद्यादान' हे 'अन्नदाना' पेक्षा श्रेष्ठ ठरतं, कारण अन्नाने क्षणीक तृप्ती होते पण विद्येमुळे जीवनभराचं सुख प्राप्त होतं. विद्यादान हे दिल्याने कमी न होता, वाढतचं जातं. म्हणून ते सर्वश्रेष्ठ ठरतं. अशा दानशूर
श्रीमती रजनीताई नानासाहेब धानोरकर यांना वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या वतीने 75 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा

Post a Comment

0 Comments