लोणावळा. प्रतिनिधी श्रावणी कामत
आज 1 जुलै 2022 शुक्रवार रोटरी नवीन वर्ष 2022-23 सुरु झाले या निमित्ताने तसेच डॉक्टर्स डे साजरा करताना, रोटरी क्लब लोणावळा तर्फे संत ज्ञानेश्वर नगरपालिका शाळा, भांगरवाडी, लोणावळा येथे शाळकरी मुलांना साठी
वैदकीय तपासणी शिबीर घेण्यात आले.
या प्रसंगी रोटरी क्लब ची नवीन कार्यकारणी उपस्थिती होती. अध्यक्ष रो आशिष मेहता, सचिव रो पुंडलिक वानखेडे, खजिनदार रो गोरख चौधरी, माजी अध्यक्ष रो जयवंत नलोदे, उपाध्यक्ष रो दिलीप पवार, रो नितीन कल्याण, रो नारायण शारवाले, रो मुस्तफा कॉन्ट्रॅक्टर, रो फातिमा कॉन्ट्रॅक्टर, रो रवि कुलकर्णी उपस्थित होते. प्रकल्प प्रमुख रो डॉक्टर डॉली आगरवाल यांनी या शिबिराचे नियोजन केले व मुलांनाची तपासणी केले. या प्रसंगी मुख्यध्यपिका सौ नीता पवार यांनी सर्वाचे स्वागत केले.
0 Comments