मंगरुळपीर
■ अष्टपैलू अंतकरणवादी लष्कर ए शिवबा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष स्व मयूर शिंदे
यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत सर्व मित्र परिवाराकडून अभिवादन म्हणून
जन्मदिनानिमित मित्र मंडळाचे वतीने १७ जुलै रोजी वृक्षारोपण व रक्तदान शिबीर घेण्यात आले होते. याप्रसंगी समाजसेवक राम पाटील ठाकरे यांनी केले रक्तदान स्थानिक महात्मा फुले उद्यान येथे
राम पाटील ठाकरे यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच साई मंगल कार्यालयात रक्तदान शिबीर संपन्न झाले. या शिबीरात ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी
समाजसेवक राम पाटील ठाकरे, बाळासाहेब मांढरे ,परळीकर, रमेश शिंदे, श्याम अरुण इंगळे, संजय भोयर, आनंद इंगोले, नाजूक भडांगे, सचिन सोळंके, एड मिलिंद बोलके, गौरव इंगळे, नितीन विटकरे, यांची इत्यादी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
लष्कर ए शिवबा मिञ मंडळ, राम ठाकरे मिञ मंडळ ,श्री गुरूध्वज मिञ मंडळ ,शिवरत्न मिञ मंडळ मंगरूळन
राजे संभाजी मित्र मंडळ मठमोहल्ला
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी लष्कर ए शिवबा मित्र मंडळा च्या सर्व युवकांनी परिश्रम घेतले.
0 Comments