Ticker

6/recent/ticker-posts

बकरी ईद निमित मंगरूळपीर पोलीस स्टेशन येथे शांतता समीती ची सभा.


मंगरूळपीर : पोलीस स्टेशन सभागृह  मंगरुळपीर येथे बुधवार दि. 6 जुलै 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता शांतता समीती ची सभा पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे होते तर ठाणेदार सुनिल हुड , इंजी.गोपाल साबळे महावितरण यांची प्रमुख उपस्थिती होती . 
भारतात सर्वच जाती  धर्माचे लोक राहतात . प्रत्येक धर्माच्या नागरिकाने आपल्या कृतीने कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. येत्या 10   तारखेला रविवारी बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लिम धर्माचे लोक त्यांच्या आदेशानुसार प्राण्यांची कुर्बानी देतात. मौलाना अन्सार अहमद खान यांनी म्हटले आहे की, ज्या प्राण्याची कायद्याने परवानगी दिली आहे, त्याचा बळी द्यायला हवा. आणि सोशल मिडीयावरील कोणत्याही पोस्टवर कमेंट करू नका . त्यामूळे आप आपसात भाईचारा राहिल . असे मत मौलाना अन्सार खान यांनी मांडले . एस डी पी.ओ . यशवंत केडगे म्हणाले की ,येणार्‍या  बकरी ईद निमीत्त 2015 मध्ये गोवंश हत्या बंदी कायदा राज्यात लागू करण्यात आला असून गोवंश किंवा गायीवर प्रतिबंध आहे. कुठल्याही प्रकारचे गैरकृत्य कोणीही करू नये . असे कुणी करत असेल तर आम्हांला सांगा. किंवा  डायल 112 ला फोन करा समाज कंटकाला थारा देऊ नये. स्वच्छतेचा संदेश देत सलोख्याने एकमेकांशी वागून सण उत्सव साजरा करावा असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांनी सभेला संबोधीत करतांना  केले . सभेला शांतता समीती सदस्य मौलाना अन्सार  अहमद खान अध्यक्ष जामा मस्जीद ट्रस्ट , बिरबलनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष रामकुवार रघुवंशी , पंचशिल बुद्ध विहाराचे अध्यक्ष विनोद डेरे , मुफ्ती अजफार , मुक्तार पटेल ,  उबेदभाई मिर्झा मा नगरसेवक , मो अफसर मा नगरसेवक, शारीक भाई, जुबेर भाई फ्रूट वाले, मो राशीद पत्रकार, मुदस्सिर सौदागर पत्रकार , राजेश दबडे पत्रकार , फूलचंद भगत पत्रकार, पंजाब भगत माजी जि प मेंबर, आदी शांतता समीतीचे सदस्य शहरातील मस्जीद चे मौलवी व इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते शांतता समीती च्या सभेचे  संचालन गजनफर हुसेन यांनी केले. तर आभार ठाणेदार सुनिल हुड यांनी मानले.

Post a Comment

0 Comments