Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस स्टेशन मंगरूळपीर हथीत अवैध धान्याचा साठा करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल

धान्य तस्करी करणारा ट्रक पोलिसांच्या जाळ्यात

पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथे दिनांक २७/०७/२०२२ रोजी फिर्यादी  रूपाली केशवराव सोळंके पुरवठा निरीक्षण अधिकारी तहसिल कार्यालय मंगरूळपीर यांनी फिर्याद दिली की, दिनांक २७/०२/२०२२ रोजी वाहन क्र MH 40 BG 6256 मध्ये संशयीत तांदूळ असल्याची माहीती नुसार दुपारी ०१.०० वा. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती मंगरहपीर येथे उपस्थीत राहून वाहनाचा शोध घेण्यात आला. परंतू १२४६ वा सादर वाहन वजन करून तेथून निघून गेल्याची माहीती निखील मोहन महाकाळ रोजंदारी कर्मचारी यांचे कडून मिळाली. मिळालेल्या माहीती वरुन कारंजा ते मंगरुळपीर रोडने असल्याची माहीती मिळाली त्यानुसार शोध घेतला असता चकवा फाटा ते शेलूबाजार रोड येथे सदर वाहन आढळून आले. वाहन क्र MH 40 BG 6256 चे चालकाचा बयान नोदविण्यात आले असता त्याचे बयानवरून सदर वाहनातील तांदूळ  अजीज खान छोटे खान रा हाफीजपुरा मंगरुळपीर यांचे मानोरा रोडवरील गोदाम येथून भरलेला असल्याचे सांगीतले कारंजा रोड वरील दुसऱ्या गोदाम मध्ये खाली करायचा होता मंगरुळपीर ते कारंजा रोडवरील चकवा फाटा येथे  थाबविण्यात आले सद्या माझे जवळ धान्याची काटा पावती आहे. इतर कोणतीही पावती नसल्याचे सांगीतले आहे. सदर वाहनातील तांदूळ संशयास्पद वाटत असल्याने पंचनामा करून पोलीस स्टेशन ला सुरक्षेच्या दृष्टीकोणातून डिटेन करण्यात आला आहे. तसेच तांदुळाचे कटटे शासकीय आहे कींवा कसे याबाबत पाहणी केली असता त्यामध्ये ४५७ कटटे मिळून आले. सदर कटटयायापैकी त्यामध्ये १२ कटटे ज्यावर MADHAYA PRADESH STATE CIVIL SUPPLES | CORPORATION RMS २०२१-२२ COMODITY WHEAT असे शासकीय स्टंपीग केलेले आढळून आल्याने श्री अजीज खान छोटे खान व वाहनाचा मालक व वाहन चालक यांचेवर पोलीस स्टेशन मंगरुळपीर ला अपराध क्र. ६०४/२०२२ कलम ३७ अत्यावश्यक वस्तू अधिनियमचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सा. मंगरुळपीर यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. मंगरूळपीरचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश शेवडे हे करीत आहेत.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चनसिंह, अपर पोलीस अधिक्षक श्री. गोरख भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री यशवंत केडगे, पोलीस निरीक्षक सुनिल हूड यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. मंगरुळपीर चे स.पो.नि. निलेश शेंबडे, सहायक पो.उप.नि. सुभाष महाजन ब.नं. ७४, पो.कॉ. जितेंद्र ठाकरे ब.नं. २९१ पो.कॉ. खुशाल गाढे ब. नं. १२८२ तसेच तहसिल कार्यालय मंगरुळपीर च्या पुरवठा निरीक्षण अधिकारी कु. रुपाली सोळंके व कर्मचारी यांचेकडून संयुक्तरित्या करण्यात आलेली आहे.
मंगरूळपीर पोलिसांनी केले गुन्हे दाखल

Post a Comment

0 Comments